रायगड जिल्हा स्वकुळ साळी मंडळाने जपली सामाजिक बांधिलकी, लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांना केले आर्थिक साहाय्य

Share Now

1,269 Views

महाड (दीपक साळुंखे) सामाजिक बांधिलकी या नात्याने रायगड जिल्हा स्वकुळ साळी सेवा मंडळाकडून जिल्हयातील रोजंदारीवर काम करणारे तसेच ज्यांचे छोटे-छोटे व्यवसाय या लॉकडाऊनमुळे बंद पडले आहेत अशा सर्व समाजबांधवांना आर्थिक मदत करण्याचा आली आहे. रायगड जिल्ह्यातील साळी समाज हा विखुरलेला असून मुळात रायगड जिल्ह्यात राहणारा साळी समाज बांधव आपला पारंपरिक सूत करण्याच्या व्यवसायाला सूत कारखान्यांच्या उभारणीने उतरती कला लागल्यानंतर व्यवसाय, शिक्षण, आणि नोकरीनिमित्ताने मुंबई, पुणे आदी सारख्या शहराकडे वळला. छोट्या-मोठ्या नोकरी, व्यवसाय करून आपल्या जिल्ह्यातील समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी रायगड जिल्हा स्वकुळ साळी सेवा मंडळ, मुंबई या मंडळाची निर्मिती झाली.

विविध वार्षिक कार्यक्रमातुन समाजबांधव एकत्र येऊन आपले समाजमन जोपासत आहे. प्रत्येकाच्या सुख, दुःखात सामील होऊन सामाजिक बांधिलकी जपत आहे. सद्या भारत देशासह जगावर कोरोना विषाणूचे महाभयानक संकट ओढावले आहे. लॉकडाऊनच्या धर्तीवर अनेक समाजबांधव गेले एक महिना घरीच आहेत. त्यामुळे आर्थिक संकटाखाली दबले गेले असून याचा विचार करून रायगड जिल्हयासह मुंबईत वास्तव्यास असलेले रोजंदारीवर काम करणारे तसेच ज्यांचे छोटे-छोटे व्यवसाय या लॉकडाऊनमुळे बंद पडले आहेत अशा समाजबांधवांना आर्थिक मदत करण्याचा मानस समोर ठेवून जिल्ह्यातील अनेक समाजबांधवांना याची झळ पोहोचली असल्यामुळे रायगड जिल्हा स्वकुळ साळी सेवा मंडळ, मुंबईकडून लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याचा उपक्रम हाती घेतला.

त्यासाठी मंडळाचे विभागीय प्रतिनिधी, पदाधिकारी, सदस्य यांनी अशा सर्व समाज बांधवांशी संपर्क साधून प्रत्यक्ष भेट घेऊन मदत करणे शक्य नसल्याने इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून परस्पर त्यांच्या खात्यात आर्थिक सहाय्य जमा केले. यासाठी मंडळाचे सचिव नंदकिशोर कोळेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विभागीय प्रतिनिधी रघुनाथ भागवत, दत्तात्रय डोईफोडे, गोरेगांवचे प्रशांत परडे, योगेश अंबुर्ले, मोहन साळी, गणेश शिपुरकर उपाध्यक्ष विजय वाऊळ, खजिनदार प्रदीप शिपुरकर, सहसचिव राम वैद्य आणि मुख्यतः सल्लागार श्री चंद्रकांत हावरे यांनी विशेष परिश्रम घेतले असे रायगड जिल्हा स्वकुळ साळी सेवा मंडळ अध्यक्ष अविनाश साळी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *