आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नातून मोहोपाड्यात शिवभोजन थाळी सुरू होणार

Share Now

673 Views

कर्जत (जयेश जाधव) कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून लाॅकडाऊन करून सर्वंत्र संचारबंदी लागू केल्याने नागरिकांना घरातच बसण्याचे आवाहन केले जात आहे. देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्र शासनाकडून लाॅकडाऊन तीन मेपर्यंत वाढविण्यात आले आहे. शिवाय कोरोनाबाधित रुग्णसंख्येत महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. यामुळे राज्यातील रायगड जिल्हा रेड झोन म्हणून घोषित झाल्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क असून योग्य ती खबरदारी घेत आहे.

गाईंडलाईंन्स आधारावर काही उद्योग व्यवसायात शिथिलता आणण्यात आली आहे. यात महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली आहे. हि थाळी मोहोपाडा आणि चौक येथे गुरुवार दि.२३ एप्रिल पासून सुरू होत आहे. रायगड जिल्ह्याची औद्योगिक नगरी म्हणून रसायनी पाताळगंगा परीसराची ओळख आहे. या परीसरात नोकरी कामधंद्यानिमित्त आलेले परराज्यातील नागरिक वास्तव्य करीत आहेत. लाॅकडाऊन काळात रसायनी पाताळगंगा परिसरातील कोणीही उपाशी राहू नये यासाठी आ. महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नातून चांभार्ली -मोहोपाडा रस्त्यावरील मोहोपाडा विज मंडळाच्या कार्यालयासमोर शिवभोजन थाळी गुरुवार दिनांक २३ एप्रिलला ठिक १२ वाजता आ. महेंद्र थोरवे यांच्या हस्ते उदघाटन होवून सुरू होत आहे.

या थाळीत दोन चपाती, पुरेसा भात, वरण व भाजी फक्त पाच रुपयांत मिळणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सुरू केलेला शिवभोजन थाळीच्या उपक्रमाला मोहोपाडा व चौकमधून चांगला प्रतिसाद मिळणार असे बोलले जात आहे. शिवभोजन थाळी उपक्रमाचा गुरुवार दि.२३ पासून लाभ घ्यावा असे आवाहन संतोष पांगत व चेतन मेश्राम यांच्यासह परिसरातील शिवसैनिकांनी केले आहे. नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन लाॅकडाऊन काळात शासनाचे नियम पाळावेत असे आवाहन आ. महेंद्र थोरवे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.