हमरापूर विभाग गणेश मूर्तिकारांच्यावतीने दोन लाख रुपयांची मदत

Share Now

467 Views

पेण (प्रतिनिधी) एकीकडे जगभरात कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे हाहाकार माजला असताना दुसरीकडे मात्र भारतात या विषाणूवर मात करण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजना करत असताना केंद्रासह राज्यशासनाला मदत म्हणून अनेक मोठ मोठे उद्योजक, अभिनेते, संस्था, मंडळे आर्थिक मदतीचा हात पुढे करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील हमरापूर भागातील हमरापूर विभाग श्री गणेश मुर्तिकार उत्कर्ष मंडळातर्फे या कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी झटणाऱ्या शासनाला दोन लाखाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिला आहे.

या निधीचा धनादेश पेणच्या तहसिलदार अरुणा जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष कृणाल पाटील, संजय पाटील, अशोक मोकल, शंकर मोकल, जयेश पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *