रोहा अष्टमी नगरपरिषदेतर्फे कर्मचारी वर्गासाठी तपासणी शिबिर, आ. अनिकेत तटकरे, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांचा स्तुत्य पुढाकार

Share Now

830 Views

रोहा (निखिल दाते) रोहा अष्टमी नगरपरिषदेतर्फे आजपासून नगरपरिषद कर्मचारी वर्गाच्या कोरोना तपासणी शिबिरास प्रारंभ झाला. या शिबिराअंतर्गत पुढील तीन दिवस पालीकेतील सर्व कर्मचारी वर्गाची मोफत तपासणी करण्यात येणार आहे.
रोह्याचा प्रथम नागरिक या नात्याने रोह्याचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी सदर तपासणी शिबिरासाठी पुढाकार घेउन सदर तपासणीसाठी आवश्यक असणारे पीपीई किट्स उपलब्ध करून देण्याची विनंती कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे आ. अनिकेत तटकरे यांना केली होती.

आ. अनिकेत तटकरेंनी त्वरेने पालिका कर्मचारी वर्गाच्या तपासणीसाठी किट्स उपलब्ध करून दिले व आज तपासणीच्या वेळी जातीने हजर राहून कर्मचारी वर्गाचे मनोधैर्य वाढवले.रोहा शहर व परिसरातील हमाल बांधव, भिक्षेकरी यांपैकी जरी कोणाला तपासणी करून घ्यायची असेल तरी त्यांनी माझ्याकडे किंवा कोणत्याही नगरसेवकाकडे संपर्क साधावा असे आवाहन नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी यावेळी करण्यात आले.

सदर शिबिराच्या ठिकाणी पालीकेतील गटनेते महेंद्र दिवेकर, नगरसेवक महेंद्र गुजर, महेश कोल्हटकर, राजेंद्र जैन, रोहा उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय आधिक्षक डॉ. अंकिता खैरकर, रोहा तालुका मेडिकल चॅरिटेबल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. फरीद चिमावकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *