महाडमध्ये कोरोनाविषयक कार्यशाळा संपन्न

Share Now

1,069 Views

महाड (दीपक साळुंखे) संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले आहे तर आपल्या देशात कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील आरोग्य यंञना सफाई कामगार त्याचप्रमाणे पोलिस बांधव या महामारीला रोखण्यासाठी दिवस रात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यातच सफाई कामगार डाॅक्टर नर्स आणि पोलिस देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूंची लागण होऊन बाधित होत आहेत याच पार्श्वभूमीवर 27 एप्रिल 20 रोजी महाडमध्ये अलिबाग येथील मनोरुग्ण तज्ञ डॉक्टर अमोल भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाबाबत समज-गैरसमज याबाबत उत्तम प्रकारे मार्गदर्शन करण्यात आले. व सोप्या भाषेत प्रशिक्षण घेण्यात आले.

यावेळी महाड ट्रॉमा केअर हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भास्कर जगताप तसेच महाड तालुक्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर बिरादार महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील, पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी, आशा कर्मचारी तसेच महाड तालुक्यातील सर्व आरोग्य कर्मचारी त्याचप्रमाणे पञकार बांधव उपस्थित होते. यावेळी डाॅ. अमोल भुसारी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कोरोना विषाणूपासून स्वतःला कसे दुर ठेवायचे याचे मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे प्रत्यक्षिक करुन दाखवले त्यामुळे उपस्थित सफाई कर्मचारी यांचे मनोबल वाढले आहे असे तालुका अधिकारी डाॅ.बिराजदार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *