वीज वितरणाच्या कामांतील टेम्पो, मजुरांना पोलिसांचे ‘ब्रेक’, पावसाळ्यापूर्वीची कामे होणार कशी ?

Share Now

714 Views

रोहा (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोहा, कोलाड, चणेरा, नागोठणे सर्वच ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. उन्हातान्हात पोलीस आपली जबाबदारी पार पाडत आहेत. घरात बसा, कोरोना टाळा, अशा सुचना प्रशासन वारंवार देत आहे. त्याच संचारबंदी, जमावबंदीची अंमलबजावणी पोलिस करतात यात वाद नाही. तरीही काही महाभाग विनाकारण भटकंती करतात, त्यांना रोखण्याचे काम पोलिसांना करावे लागत आहे. याच कायद्याच्या कचाट्यात महत्वाची कामे करणारे मजूर कामगार मुख्यतः वीज वितरणाची कामे करणारे ठेकेदार सापड़तात, याची प्रचिती पुन्हा नव्याने आली. मजुरांना ने आण करणारे, माल वाहतूक करणारे टेम्पो पोलिस अडवत असल्याने कामांना ब्रेक लागत आहे. अशात वीज वितरणाची पावसाळापूर्वीची कामे उरकणार कशी ? असा सवाल उपस्थित झाला आहे. दरम्यान, पोल उभे करणे, विद्युतवाहिन्यांची कामे करणाऱ्या वीज वितरणाचे ठेकेदार, त्यांचे मजूर यांना प्रशासनाने सूट द्यावी अशी मागणी झाली आहे तर सबंधित प्रशासनाने वीज वितरण कामातील अडथळा दूर करण्यावर भर द्यावा. असे आता नागरिकांतून बोलले जात आहे.

कोरोनाचा फटका सर्वव्यापी सर्वच कामांना बसत आहे. त्यातून कोणाचीच सुटका नाही. कोरोनाबाधीत क्षेत्र होऊ नये याची दक्षता प्रांत, तहसिल, पोलिस प्रशासन घेत आहे. त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे पोलिस करतात. तरीही काही महाठग फिरत असल्याचे दिसून येते. काहीजण शहरात गर्दी करतात. रोहा अष्टमी नागरपालिकेनेही प्रभावी नियोजन केले. मुख्यतः पोलिस नियमांची अंमलबजावणी करताना महत्वाच्या सेवाकर्मींनाही फटका बसतो. त्यात वीज वितरणच्या ठेकेदाराचे माल वाहतूक टेम्पो, टेम्पोतील मजुरांना अडविले जाते. वीजेची काम सांगूनही काही पोलिस सोडत नाही.वीज वितरणाच्या ठेकेदाराकडून चलन फाडले जाते. अशात कामासबंधी खात्री झाल्यावरही पोलीस का सोडत नाहीत ? अशी स्पष्ट नाराजी वीज वितरणाच्या ठेकेदारांनी व्यक्त केली आहे. जीव कशाला धोक्यात घालता, घरी बसा असा जाणीवेचा सल्ला पोलीस देतात ? यात वाद नाही.पण आम्हालाही जीवाची काळजी आहे, पण वीज वितरणाची कामेही पूर्ण झाली पाहिजेत. पावसाळ्यापूर्वी कामे न झाल्यास विजेला मोठा फटका बसेल. त्यामुळे पोल उभे करणे, विद्युतवाहिन्याची कामे करणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्हाला, आमच्या मजुरांना सूट दयावी,अशी विनंती वीज वितरणाचे ठेकेदार दादा धुमाळ यांनी केली आहे.

रायगड यांसह रोहा तालुक्यात वीज वितरण विभागाने पावसाळ्यापूर्वीची कामे हाती घेतली. वीज वहकासाठी अडथळा येणारी झाडे तोडणे, नवे पोल उभारणे, विद्युतवाहिन्यांची कामे युद्धपातळीवर सुरु झाली. अशात पोल उभारणी व वाहिन्यांची कामे ठेकेदार करीत असतो त्याच ठेकेदाराचे मजूर, मालाचे टेम्पो पोलिस अडवित असल्याने कामांना विलंब होत आहे. तरी अत्यावश्यक कामांतील मजुरांना खात्री करुन सोडून द्यावे, दुसरीकडे वीज वितरणाच्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदार व त्यांचे मजुर यांना लॉकडाउनमधून कामावेळेत सूट द्यावी अशी मागणी प्रशासनाकडे करावी. दरम्यान, वीज वितरणाच्या कामासाठी जाणाऱ्या मजूर, टेम्पोला पोलिस ब्रेक लावत असल्याने काम उरकणार कशी ? याचा गांभीर्याने विचार करुन सबंधित प्रशासनाने दखल घ्यावी, त्यात प्रशासन कितपत दखल घेतो ? हे पाहावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *