राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलच्यावतीने रोह्यातील डॉक्टरांना फेसशिल्डचे वाटप

Share Now

396 Views

रोहा (निखिल दाते) गेले महिनाभर लॉकडाउनच्या कठीण काळात रोह्यातील सर्व डॉक्टरांनी चांगली सेवा दिली असून त्यांच्या या लढ्याला आधिक बळकटी देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर्स सेलच्यावतीने रोह्यातील डॉक्टरांना विषाणूंपासून संरक्षण करण्यासाठी मंगळवारी फेसशिल्डचे वाटप करण्यात आले. यावेळी रायगडचे खा. सुनिल तटकरे यांची उपस्थिती होती त्यांनी कोरोनाशी लढा देतांना महत्वपूर्ण भूमिका बजावणारे सर्व डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी यांचे विशेष कौतुक करून त्यांचे मनोधैर्य वाढवले.

यावेळी रायगड मेडिकल असोसिएशचे अध्यक्ष डॉ. देवेंद्र जाधव, रोहा तालुका मेडिकल चॅरिटेबल असोसिएशन व तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर्स सेलचे अध्यक्ष डॉ. फरीद चिमावकर, राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. विश्वनाथ देशमुख, डॉ. कांचन कदम, डॉ. किरण म्हात्रे, डॉ. ज्ञानेश्वर पाटील, रोहा तालुका डॉक्टर्स सेल उपाध्यक्ष डॉ. तेजकुमार आपणकर आदी डॉक्टर्स उपस्थित होते. रोह्याचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी सर्व डॉक्टरांचे स्वागत केले. सामाजिक अंतर राखून हा उपक्रम संपन्न झाला.

राष्ट्रवादी वेलफेयर ट्रस्टच्यावतीने कोरोनाशी लढा देतांना आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत असलेल्या रोहे तालुक्यातील सर्व डॉक्टरांचे विषाणूंपासुन संरक्षण व्हावे यासाठी फेसशिल्डचे वाटप करण्यात आले यामुळे कोरोनाविरुद्धच्या लढ्याला आधिक बळकटी मिळणार आहे. रायगडचे खासदार सुनिल तटकरे आपुलकीच्या प्रेरणादायी शब्दांमुळे आमचे मनोधैर्य वाढले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *