कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेण येथे रक्तदान शिबिर संपन्न, १६८ रक्तदात्यांकडून विक्रमी रक्तदान

Share Now

710 Views

पेण (अरविंद गुरव) राज्यात रक्ताचा पुरवठा कमी पडू नये यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. त्यामुळे, बऱ्याच ठिकाणाहून रक्तदान शिबीरांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच पेण नगरपरिषदेच्या माध्यमातून पेण नगरपरिषदेच्या इंनडोअर हॉल येथे रक्तदानाचे आयोजन केले होते. या शिबिराला पेण न.प. कर्मचारी आणि पेणकरांनी उत्फुर्थ प्रतिसाद दिला.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या अनुषंगाने राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांनी पुढील काळात रक्ताचा तुटवडा होऊ नये, याकरता नागरिकांना रक्तदानाचे आवाहन केले होते. आवाहानाला प्रतिसाद देत पेण शहरातील नागरिक आणि पेण नगरपरिषदेचे कर्मचारी यांनी रक्तदान केले. शासकीय परवानगी घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासत, सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करत हे रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात १६८ बाटल्या रक्त जमा करण्यात आले असून हे रक्त एमजीएम हॉस्पिटल रक्तपेढीला देण्यात आले. शिबिराच्या ठिकाणी येणाऱ्या रक्तदात्यांची थर्मल स्क्रीनिंग आणि निर्जनतुकीकरन करून आत प्रवेश देण्यात आला. यावेळी पेण न.पा.च्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *