मुरूड तालुक्यात तीन कोरोना बाधित नागरिक सापडले; तालुक्यात घबराट

Share Now

1,031 Views

मुरुड (अमोल जैन) रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यतील एकदरा, महालोर, आणि मिठेगर येथील प्रत्येकी एक एक नागरीक हा कोरोना बाधित नागरिक सापडले आहेत. हे तीन रुग्ण सापडले असल्याने तालुक्यात घबराट निर्माण झाली आहे. यातील मिठेगर येथील कोरोना बाधित नागरिक याची प्रकृती चिंताजनक आहे. मुरूड तालुक्यतील सावली ग्रामपंचायत हद्दीतील मौजे मिठेगर येथील कॊरोना बाधित नागरिक हा मुंबई येथील वडाळा येथून 18 मे 2020 रोजी आला होता. त्याची स्वॅब चाचणी केली होती त्या चाचणीचा परीक्षण अहवाल हा 20 मे रोजी पॉझिटिव्ह आला. त्यांना अधिक उपचारासाठी अलिबाग येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

मुरूड तालुक्यतील वावडुंगी ग्रामपंचायत हद्दीतील मौजे महालोर येथील वीस वर्षीय व्यक्ती ही मुंबई अंधेरी येथून 12 मे 2020 रोजी आली होती. त्याला ताप आणि इतर आजार असल्याने त्यास पाच ते सहा दिवस मुरूड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याचा ताप कमी झाला होता. त्याची स्वॅब चाचणी घेण्यात आली. चाचणी अहवाल सुद्धा कोरोना बाधित असल्याचे आले आहे. मुरूड शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एकदरा ग्राम पंचायत हद्दीतील एक महिला ही मुंबई कफपरेड (कुलाबा) येथून 18 मे 2020 रोजी आली. तिचीही स्वॅब चाचणी घेण्यात आली होती. त्या चाचणीचा परीक्षण अहवाल सुद्धा कोरोना बाधित असल्याचे आले आहे. या तिन्ही कोरोना बाधित नागरिकांना अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मुरूड तालुक्यतील मिठेखार येथील 28 वर्षीय महिलेवर मुंबई येथील जे.जे.रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूनंतर तिचे परीक्षण अहवाल कॊरोना बाधित असल्याचे आले तीन कोरोना बाधित रुग्ण तालुक्यात सापडल्याने तालुक्यतील कोरोनो बाधित नागरिकांची संख्या ही चार एवढी झाली आहे.मुरूड तालुक्यात चाकरमानी मोठ्या प्रमाणात चालत येत असल्याने तसेच ग्रामीण भागात मुंबई तसेच इतर गांवातुन येणाऱ्या चाकरमान्यांचा वाढता कल असल्यामुळे मुरूड तालुक्यातील नागरीकांनी प्रशासनाचे अध्यादेश पाळुन सुरक्षित राहणे व आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज आहे. असे प्रशासकीय अधिकारी यांनी आमच्या प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *