कापडे निवाचीवाडी येथे दोन तर उमरठ येथील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

Share Now

1,491 Views

पोलादपूर (प्रतिनिधी) पोलादपूर शहरात यापूर्वी एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू झाल्यानंतर आज शनिवार रोजी पुन्हा तालुक्यातील कापडे बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत निवाचीवाडी येथे 2 कोरोना पॉझिटिव्ह तर उमरठ फौजदार वाडी येथे एकजण असे तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्याची माहिती तहसीलदार दिप्ती देसाई यांनी दिली आहे. पोलादपूर तालुक्यात १ मे पासून सुमारे ५ हजार पेक्षा जास्त चाकरमानी तालुक्याच्या ग्रामीण भागात दाखल झाले आहेत या चाकरमान्यांची प्रशासनाच्यावतीने होम कॉरं टाइन करण्यात आले असले तरी काही चाकरमानी रात्री-अपरात्री तालुक्यात दाखल झाले आहेत. दरम्यान, १५ मे नंतर पोलादपूर तालुक्यात ग्रामीण भागात कापडे बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील निवाची वाडी येथील दोघेजण गेल्या तीन दिवसापूर्वी मानगाव उपजिल्हा रुग्णालय येथे सर्दी खोकला आजारामुळे उपचारासाठी पाठविण्यात आले होते त्यांची कोविड 19 स्टेस्ट करण्यासाठी स्लॅब एमजीएम रुग्णालय पनवेल येथे पाठवण्यात आले होते.

उमरठ ग्रामपंचायत हद्दीतील फौजदारवाडी येथे एका व्यक्तीस श्वास घेण्यास अडथळा होत असल्याने त्याला माणगाव येथे पाठवण्यात आले होते त्याचे को विड १९ स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची ची यादी बनविली आहे तर प्रशासनाकडून निवाचीवाडी व उमरठ फौजदार वाडी सील करून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याची काम सुरू असल्याचे समजते. पोलादपूर तालुक्यात ग्रामीण भागात करोना ने शिरकाव केल्यामुळे तालुक्यात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे मात्र नागरिकांनी कोणत्याही घटनेला घाबरून जाऊ नये प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना व आदेशाचे पालन करून पालन काळजी घ्यावी असे आव्हान प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *