घोणसे घाटात पेट्रोल व डिझेल वाहतूक करणार्‍या टँकरचा अपघात: पेट्रोल व डिझेल चोरी करण्यासाठी जीव मुठीत घेऊन ग्रामस्थांची धावपळ

Share Now

822 Views

म्हसळा (निकेश कोकचा) म्हसळा तालुक्यातील घोणसे घाटामध्ये रविवारी सकाळी पेट्रोल व डिझेल वाहतूक करणार्‍या टँकरला अपघात झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी पेट्रोल व डिझेल चोरी करण्यासाठी जीव मुठीत धरत बालदी, ड्रम व बॉटल घेऊन एकच गर्दी केली होती. शिवडी येथून भारत पेट्रोलियमचा टँकर ८ हजार लीटर पेट्रोल व ४ हजार लीटर डिझेल घेऊन श्रीवर्धन येथिल लांबे ऑटोमोबाइल येथे निघाला होता.मात्र रविवारी सकाळी म्हसळा तालुक्यातील घोणसे घाटामध्ये चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने या टँकरचा अपघात झाला.

अपघात झाल्यानंतर चांदोरे,घोणसे व देवघर या परिसरातील नागरिकानी १००-२०० रुपयांसाठी आपला जीव धोक्यात घालून तब्बल २ ते ३ हजार लीटर पेट्रोल व डिझेल बालदी,द्रम व बॉटल मध्ये भरून चोरून घेऊन गेल्याचे समजते.टँकरमध्ये असणार्‍या उर्वरित पेट्रोल व डिझेल पैकी किमान 3 हजार लीटर पेट्रोल व डिझेल वाहून गेला आहे.या अपघाताची माहिती मिळताच तहसिलदार शरद गोसावी, सर्कल दत्ता कर्चे, पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक धनंजय पोरे, पोलिस निरीक्षक दिपक धूस, हवालदार भोईर व वाहतूक पोलिस कारकिले हे घटना स्थळी पोहचले. यनांनातर हा पेट्रोल व डिझेलचा टँकर दक्षता घेत क्रेनच्या मार्फत रस्त्यामधून बाजूला काढण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *