आपत्कालीन परिस्थितीत रोटरी करीत असलेले कार्य कौतुकास्पद ; आ. अनिकेत तटकरे

Share Now

482 Views

रोहा (निखिल दाते) रोटरी क्लब रोहा सेंट्रल आणि रोहे अष्टमी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाविरुद्धच्या लढ्याला अधिक बळकटी देण्यासाठी रोहे अष्टमीतील सर्व घरात देण्यासाठी आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांच्या दहा हजार बॉटलचे रोहे अष्टमी नगरपरिषदेच्या सर्व प्रभागातील नगरसेवकांना ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे आज वितरण करण्यात आले. सदर उपक्रमाला कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे आ. अनिकेत तटकरे यांची प्रेरणादायी उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी कोव्हिड विरुद्धच्या लढ्यात रोटरीच्या देशस्तरावरील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करुन रोटरी क्लब रोहा सेंट्रलच्या कामाचीही विशेष प्रशंसा केली.

रोहेकरांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रोहे अष्टमीकरांसाठी आर्सेनिक अल्बम 30 च्या दहा हजार बॉटल वितरित करण्याचा रोटरी क्लब रोहा सेंट्रल व रोहे अष्टमी नगरपरिषदेचा उपक्रम स्तुत्य असल्याचे गौरवोद्गार आ. अनिकेत तटकरे यांनी यावेळी काढले. सदर उपक्रमासाठी रोहे अष्टमी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, रोह्याचे पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर, उपनगराध्यक्ष समीर सकपाळ, रोटरी क्लब रोहा सेंट्रलचे अध्यक्ष गणेश सरदार, गटनेते तसेच रोटरी क्लब रोहा सेंट्रलचे प्रेसिडेंट इलेक्ट महेंद्र दिवेकर, आरोग्य सभापती अहमद दर्जी, नगरसेवक महेंद्र गुजर, दिवेश जैन, मयूर पायगुडे, अलीम मूमेरे, महेश कोलाटकर, रियाज शेट्ये, कादीर रोगे, रोहा तालुका मेडिकल चेरिटेबल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. फरीद चिमावकर, डॉ आपणकर ज्येष्ठ पत्रकार अरुण करंबे, माजी नगरसेवक तसेच पत्रकार अल्ताफ चोरडेकर, पत्रकार विश्वजित लुमण आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आ.अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितित सर्व नगरसेवकांना प्रभागनिहाय औषध गोळ्यांच्या बाटल्या वितरित करण्यात आल्या. उपक्रम यशस्वी होण्यासाठी रोटरी क्लब रोहा सेंट्रलचे प्रेसिडेंट गणेश सरदार, प्रेसिडेंट इलेक्ट महेंद्र दिवेकर, डॉ. कैलाश जैन, प्रभारी सेक्रेटरी सूचित पाटील, खजिनदार मनोज बोराणा, क्लब डायरेक्टर दीपक सिंग, परेश जैन, विकास जैन, महेंद्र खेरटकर, रूपेश कर्णेकर, सोहीत कांकरीया, प्रदीप मेहेता, गीतराज म्हस्के, अजित तेलंगे आदी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *