मुरूड तालुक्यात येथे चार कोरोना बाधित रुग्ण सापडले, मुरूड शहरात कोरोनाचा शिरकाव

Share Now

275 Views

मुरूड (अमूलकुमार जैन) मुरूड तालुक्यतील खाआंबोली येथे तीन तर मुरूड नगरपरिषद हद्दीत एक कोरोना बाधित नागरिक सापडले असल्याने मुरूड तालुक्यतील कोरोना बाधित नागरिक सापडले असल्याने तालुक्यतील कोरोना बाधित रुग्ण यांची संख्या ही पंधरावर गेली आहे यातील मिठेखार आणि मिठेगर येथील रुग्ण यांचा मृत्यू झाला आहे. मुरूड नगरपरिषद हद्दीतील मसाल नामक गल्लीत एक महिला ही ठाणे येथून 27 मे2020 रोजी आली होती.त्याच दिवशी तिची स्वॅब चाचणी करण्यात आली होती.

त्या चाचणीचा अहवाल आज दिनांक 29 मे 2020 रोजी रात्री उशिरा आला आहे. खारआंबोली येथे आज एक महिला व दोन पुरुष असे तीन नागरिक हे कॊरोना बाधित आढळले आहे.ह्या सर्व व्यक्ती खारआंबोली येथील 47 वर्षीय व्यक्ती ही28मे2020 रोजी कॊरोना बाधित आढळली होती .त्याचाच कुटुंबातील व्यक्ती आहेत. मुरूड तालुक्यतील मिठेखार 28 वर्षीय महिला ही उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल होती.तिचा मृत्यू झाल्यानंतर तिची येथील स्वॅब चाचणी घेण्यात आली होती.तिचाही अहवाल हा कोरोना बाधित असल्याचा आला होता.तर मिठेगर येथील वडाळा येथून आलेला 58 वर्षीय वृद्ध यांचा उपचारदरम्यात मृत्यू झाला आहे.

मुरूड तालुक्यात चाकरमानी मुंबई व इतर गावातुन येथून मोठ्या प्रमाणात येत आहेत. येणाऱ्या चाकरमान्यांचा वाढता कल असल्यामुळे मुरूड तालुक्यातील नागरीकांनी प्रशासनाचे अध्यादेश पाळुन सुरक्षित राहणे व आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज आहे.तसेच नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक आसेल तरच घरा बाहेर पडा ते पण तोंडाला मास्क लावुनचं , कोरोनाचा फैलाव दिवासान दिवस वाढत आहे. दोन व्यक्तीमध्ये किमान दीड मीटरचे अंतर ठेवणे निंतांत गरजेचे आहे.त्याची साखळी तोडणे आवश्यक आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुम्ही घरी राहणे हे महत्वाचे आहे. कोणाला सर्दी, खोकला , ताप असेल तर त्या रुग्णाने ताबडतोब ग्रामीण रूग्णालयात दाखल व्हावे. असे आवाहन ही मुरूड तहसीलदार- गमन गावीत यांनी केले. मुरूड तालुक्यतील कोरोना बाधित नागरिकांची संख्या मुरूड नगर परिषद 1 रुग्ण, एकदरा 4 रुग्ण, महालोर 3 रुग्ण, खारआंबोली 4 रुग्ण, मिठेगर 2 रुग्ण एकावर उपचार सुरू असून एक मयत आहे, मिठेखार 1 रुग्ण मयत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *