म्हसळ्यामध्ये कोरोनाचा हाहाकार, एकाच दिवसात सापडले १० नवीन रुग्ण, एकत्र क्वारंटईन करणे ठरले धोक्याचे

Share Now

1,134 Views

म्हसळा (निकेश कोकचा) म्हसळा तालुक्यात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले असून, तालुक्यात एकाच दिवशी १० रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तालुक्यात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा २० वर पोहचला आहे.यामध्ये शनिवारी खरसई येथील एका महिलेचा माणगाव येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची देखील घटना घडली आहे. म्हसळा तालुक्यातील वारळ या गावामध्ये क्वारंटईन करण्यात आलेल्या एका महिलचा २५ मे रोजी अचानक मृत्यू झाला होता. या महिलेचा कोरोना अहवाल मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आल्याने गावात खळबळ माजली होती.आता या माहीलाच्या संपर्कात येणारा तिचा नवरा, जावई, दोन नात/नातू व एक शेजार्‍याला असे एकूण ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. व इतर काही जणांचे नमुने तपासणिसाठी पाठवले असुन त्यांचा अहवाल येणे बाकी आहे.

तालुक्यातील पाभरे ग्रामपंचायत हद्दीत देखील २ नवीन कोरोना रुग्णांची भर झाली आहे. मुंबई येथून आलेल्या एका नागरिकाला शाळेमध्ये क्वारंटईन करण्यात आले होते. या नागरिकाचा कोरोना अहवला पॉझिटिव्ह आला असून,या शाळेमध्ये त्याचा समवेत क्वारंटईन असणार्‍या इतर दोन जणांचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे.यामुळे पाभरे येथे चकरमण्याना एकत्र क्वारंटईन करणे धोक्याचे ठरले असल्याची चर्चा सुरू आहे. ठाकरोळी येथील न्यू अनंतवडी येथे कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने या रुग्णाची बाईको व भाचीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्याचा आई व मुलीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तालुक्यातील म्हसळा नगरपंचायत हद्दीतील दुर्गवडी येथे १(मृत) खरसई येथे १ (मृत) ,वारळ येथे ६ (यामध्ये १ मृत) पाभरे ग्रामपंचायत हद्दीत पाभरा ५ व गायरोणे २, कणघर येथे १, ठाकरोळी येथे ३, तळवडे येथे १ असे एकूण कोरोना बाधित २० रुग्ण तालुक्यात आहेत.

म्हसळा शहरामध्ये लॉकडाउनच्या काळात वाढती गर्दी कोरोना विषाणूसाठी पोषक ठरणार असून, या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी नगरपंचायतीने लवकरच उपाययोजना नाही केल्यास, म्हसळा तालुका कोरोना हॉटस्पॉटचा नवीन केंद्र होणार असल्याचे जानकारांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.