पोलादपूर (दीपक साळुंखे) पोलादपूर तालुक्यातील माटवण येथे पूर्व वैमनस्यातून झालेल्या भांडणाचे पर्यावसन थेट खून होण्यात झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे ही घटना रविवार रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की माटवण येथील गणपत मांढरे हे सायंकाळी शेतात च्या मार्गाने जात असतात त्यांना एका इसमाने बांबू ने प्रहार करत मारहाण केली डोक्यावर तसेच इतर ठिकाणी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे
सदरची घटना समजताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी माटवन गावात दाखल झाले असून पंचनामा सह सखोल चौकशी करत आहेत.
मयत गणपत मांढरे यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनसाठी आणण्यात आले असून या घटनेची माहिती मिळताच युवा नेते विकास गोगावले यांनी ग्रामीण रुग्णालयात रात्री भेट घेत आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली त्याच्या समवेत शिवसैनिक सह नगराध्यक्ष, उप नगराध्यक्ष, नगरसेवक उपस्थित होते. राजकीय वादातून मारहाण झाल्याची चर्चा पोलादपूर मध्ये होत असून पोलीस प्रशासना सर्वच बाजूनी तपास केरत असून या हत्या मागील सत्य बाहेर येईल असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
रात्री उशिरा पर्यत पोलीस प्रशासन कडून जाब जबाब नोंदवून घेण्यात आले. रायगडच्या पोलादपूर तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिक गणपत मांढरे यांचा रात्री खून करण्यात आला. ते 55 वर्षांचे होते. गावाबाहेरील शिवमंदिरासमोर लाठ्या काठ्यांनी त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर गावात तणावाचे वातावरण आहे. गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. हा खून कुणी केला हे अद्याप समोर आलं नसलं तरी पूर्ववैमनस्यांतून हा खून झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. मांढरे यांचा मृतदेह पोलादपूरच्या ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. दरम्यान जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतलाय.