सुदर्शनने केला रोहयात कोरोनाचा विस्फोट ! आणखी 10 जण पॉझिटीव्ह; दोन दिवस कंपनी बंद, तालुक्यात आज एकाच दिवशी आढळले 15 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण ; रोहा, वरसे, धाटाव पंचक्रोशीत भीतीचा वातावरण.

Share Now

522 Views

रोहा (राजेंद्र जाधव) रोहा तालुक्यात आज एकाच दिवशी 15 नवे कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाल्याची माहिती रोहा तहसील कार्यालयाकडून देण्यात आली. यामध्ये बहुतांश रुग्ण रोहा शहर आणि परिसरात राहात आहेत. सुदर्शनच्या स्वैब घेण्यात आलेले दहाच्या दहा जन पॉझिटीव्ह आढळून आले असल्याने सुदर्शनने रोहयात कोरोनाचा विस्फोट केल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. ही कंपनी आता 2 दिवस बंद ठेवण्यात आली आहे.

रोहा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरात संपर्कात आलेले 2 जण, सुदर्शन कंपनीतील आणखी 10 जण कोरोना बाधित झाले असून रुग्णांच्या संपर्कात आलेल्या दोन पत्नींचाही त्यात समावेश आहे. सुदर्शन कंपनीतील कामगारांचा आकडा खूप जास्त असून तो अधिक वाढण्याची भीती आता कामगार वर्गातूनच व्यक्त होत आहे. परिणामी शुक्रवारी कंपनीतील बहुसंख्य कामगारांनी कामावर जाण्याचे टाळले, त्याचबरोबर कंपनी गेटवर ग्रामस्थांनी केलेला हंगामा आणि रोहयात सर्वत्र सुदर्शन बाबत संताप व्यक्त असल्याने सायंकाळी कंपनी दोन दिवस बंद ठेवण्यात येत असल्याचे कामगारांना सांगण्यात आले. आढळुन आलेले कोरोना बाधित हे रोहा अष्टमी, वरसे मध्ये राहतात, त्यामुळे ते कोणाकोणाच्या संपर्कात आलेत याचा त्यांच्या ग्राफवरून शोध घेतला जाणार आहे. परिणामी रोहा, वरसे धाटाव पंचक्रोशीत भीतीचे वातावरण आहे. तर हा संकट दूर होताच एमआयडीसी मधील कामगार सुदर्शन विरोधात आंदोलन करतील असा इशारा कामगार समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश मगर यांनी दिला आहे.

आज आढळून आलेल्या नवीन 15 रुग्णांमध्ये शहरातील 7, वरसे 2, सुदर्शन कॉलोनी 2, भिसे 1, शेणवई 1 आणि नागोठणे 2 असा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज आढळून आलेल्या 15 नवीन रुग्णांमुळे रोहा तालुक्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 72 वर पोहोचली आहे. यापैकी 26 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत येथे 46 रुग्णांवर पुढील औषधोपचार सुरु आहेत.

प्रतिक्रिया ;

रोहा तालुक्यात कोरोना विषाणूची आग सुदर्शनने भडकाविली, सुदर्शनच्या चुकीमुळे असंख्य लोकांचे रोजगार बुडणार असून बाजारपेठ, दुकान धंदे बंद राहिल्याने नुकसान होणार आहे. कामगारांमध्ये लक्षणे दिसून येत असतानाही कारखाना बेकायदेशीरपणे चालू ठेवणारे सुदर्शनला पाठीशी घालणारे नेते, जिल्हा प्रशासन व कंपनी मालक याला जबाबदार आहेत.
-सुरेश मगर, अध्यक्ष -रोहा तालुका कामगार समन्वय समिती

कामगार आजारी असल्याची कल्पना असतानाही सुदर्शनने बेजबाबदारपणे उत्पादन सुरू ठेऊन कामगारांसह तालुक्यातील जनतेला अडचणीत आणले.
सुदर्शनची चौकशी करून कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा.
– नितीन परब, अध्यक्ष – रोहा तालुका सिटीझंस फोरम

सुदर्शनच्या स्वार्थीपणामुळे तालुक्यात कोरोना आजाराचा भडका उडाला आहे, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असून येथिल कामगारवर्ग त्यामुळे अडचणीत सापडला आहे. यासाठी सुदर्शनला पाठीशी घालणारे राज्य सरकार।ही तेवढेच दोषी आहे.
– अमित घाग, जिल्हा अध्यक्ष – भारतीय जनता युवा मोर्चा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *