धाटावमधे कोरोनाचे २  पोझिटीव्ह रुग्ण सापडल्याने घबराटीचे वातावरण, बाजारपेठ बंद

Share Now

700 Views

धाटाव(शशिकांत मोरे) सबंध महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गाने अक्षरशः थैमान घातले असताना रायगडमध्ये रोहा तालुक्यात विशेषतः आता धाटावमध्ये कोरोनाचे २ पोझिटीव्ह रुग्ण सापडल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान धाटावमधील सर्व दुकाने, बाजारपेठ बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट पहावयास मिळत आहे.

औद्योगिक वसाहत असलेल्या रोहा तालुक्यात कालपर्यंत बाधीतांची संख्या ७६ होती. मात्र आता १६ नव्या रुग्णांची भर पडल्याने कोरोना बाधितांची आता संख्या ९२ वर पोहोचली आहे. मात्र यापैकी ५३ रुग्ण औषधोचार घेत असून ३९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

धाटावमधे असलेल्या २ पोझिटीव्ह रुग्णांपैकी एक ६४ वर्षीय वृद्ध रुग्ण हा धाटाव गावातील असून दुसरा २१ वर्षीय तरुण रुग्ण हा विष्णुनगर परिसरातील आहे.तर किल्ला गावातही एक २५ वर्षीय युवक आढलला आहे.
६४ वर्षीय वृद्ध डायलिसिस रुग्ण असल्याने धाटावचे माजी सरपंच विनोदभाऊ पाशिलकर यांनी तत्काळ पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याशी संपर्क साधून कामोठे येथील एमजिएम रुग्णालयात अधिक उपाचाराकरिता हलविण्यात आले आहे.दरम्यान याठिकाणी ग्रामविकास अधिकारी दीपक चिपळूणकर,तलाठी तुंब्रे, उपसरपंच यशवंत रटाटे,सदस्य रुपेश रटाटे,पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी काम पाहिले.तर दुसऱ्या २१ वर्षीय तरुणाला अधिक उपचारा करिता आरोग्य विभागाच्या वतीने हालचाली सुरू आहेत.

दरम्यान कोरोनाच्या महामारित जनता अक्षरशः भरकटली असताना रुग्णाच्या आकड्यातही प्रचंड वाढ होताना दिसते.एकंदरीत आजवर असलेली आकडेवारी आता शंभरी पूर्ण करेल की याच भीतीदायक वातावरणात रोहेकर आहेत.गेली कित्येक दिवसांपासून रोहा बाजारपेठ बंद असून धाटाव नाका सुद्धा बंद ठेवण्यात आला आहे.त्यामुळे पंचक्रोशीत वातावरण सध्या कोरोणाच्या सावटाखाली असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *