पोलीस नाईक सतिष सुभाष दडस उत्कृष्ट कामगिरी बद्दल सन्मानित

Share Now

421 Views

महाड (दीपक साळुंखे) पोलीस खात्यात गेली पंधरा वर्ष जबाबदारी आणि प्रमाणिकपणाने काम करत असलेले महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सतिष सुभाष दडस यांनी कोरोना संकट काळात आणि काही दिवसा पूर्वी आलेल्या चक्री वादळात आपल्या जबाबदारीची आठवण ठेवत चांगली कामगिरी बाजावल्याने त्यांना रायगडच्या पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्याकडून सन्मानित करण्यात आले.

पोलीस सतिष दडस हे पोलीस खात्यामध्ये गेली पंधरा वर्षापासून कार्यरत आहेत. मूळचे सातारा जिल्ह्यातील टाकेवडी या एक खेडे गावचे रहिवाशी आहेत. नोकरीचा सुरवातीला येरवडा जेलमध्ये रुजू झाले. अनेक पोलीस ठाणे करत आज महाड शहर पोलीस ठाण्यात गेली तीन वर्ष पोलीस नाईक म्हणून रुजू आहेत. सध्या त्यांना दासगाव आऊट पोस्ट देण्यात आले असून अनेक गाव त्यांच्या अखत्यारीत येतात. कोरोनाच्या संकट काळात लोकांना समजूतपणाने समजावून सांगणे लोकांकडे प्रेमाने वागणे यामुळे प्रेमळ पोलीस म्हणून ओळखले जाऊ लागले. इतरवेळी ही यांची वागणूक अशाच पद्धतीत होती. कोरोनाच्या संकट काळात धाडस दाखवत नागरिकांच्या समोरे जात या आजाराबाबत जणतेमध्ये जनजागृती करण्याचे काम केले. आजही पोलीस नाईक म्हणून रात्रंदिवस कर्तव्य म्हणून कोरोनाचा धारशी मुकाबला करत आहेत. काही दिवसापूर्वी या विभागात अचानक चक्रीवादलाने हजेरी लावली होती, त्यावेळी देखील लोकांच्या मदतीला धाऊन गेले, त्यावेळी देखील दडस यांनी चांगली कामगिरी बजावली.

या सर्व चांगल्या वर्तणुकीवर रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी विशेष प्रमाण पत्र देऊन त्यांना सन्मानित केले आहे. भविष्यात अशीच उत्कृष्ट कामगिरी बजावत राहतील अशी आशा जनतेकडून केली जात असून परिसरातून या कामगिरीबद्दल सर्व स्थरावरून शुभेच्छा देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *