तांबडी बुद्रुक येथील बलात्कार करुन खून करणा-या आरोपीच्या रोहा पोलिसांनी 12 तासात मुसक्या आवळल्या

Share Now

5,648 Views

रोहा (वार्ताहार) रविवारी 26 जुलै रोजी रोहा तालिक्यातील तांबडी येथे एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन खुण केल्याची घटना घडली. यासंबधी सदर गुन्हा उघडकीस आनणेकरीता पोलिस अधिक्षक अनिल पारस्कर यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी, पोलिस निरिक्षक सोनाली कदम, पोलिस निरिक्षक नामदेव बंडघर, स्थानिक गुन्हे शाखा शेख, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष आबा जाधव, शिंदे, गिरी, सोनके, खंडागळे , शेंडगे स्थानिक गुन्हा शाखा कडील व रोहा पोलिस ठाणेकडील पोलिस स्टाफ यांनी अथक प्रयत्न करुन 12 तासांच्या आत गुन्हा उघडकीस आणला आहे. याबाबत रोहा पोलिस ठाण्यात गु.र.नं. 54/2020, भादवी कलम 376 (1), 302, 201, बालकाचे लैंगिक अपराधा पासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 8 प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी हे करीत आहेत.

तांबडी बुद्रुक येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी स्कुटी चालवीत घेऊन मौजे ताम्हणशेत येथे शेतामध्ये काम करीत असलेले फिर्यादीचे वडिल यांना आणणेकरीता सायंकाळी 5.45 वाजताच्या सुमारास गेली होती. सायंकाळी 8.00 वाजेपर्यंत मुलगी परत घरी न आल्यामुळे घरातील तिची आई, वडिल व इतर घरातील मंडळी यांना काळजी वाटू लागली. मुलीचा शोध घेण्याकरीता घरातील मुलीचे आई, वडिल व इतर ग्रामस्थ ताम्हणशेत बुद्रुक या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी मुलगी चालवीत घेऊन आलेली स्कुटी ही रस्त्याच्या कडेला उभी असल्याची दिसली. परंतू मुलगी कोठेही आजुबाजुच्या परिसरात दिसून येत नव्हती. रात्रीचे 8.00 वाजल्यामुळे परिसरात अंधार पसरला होता. ताम्हणशेत बुद्रुक गावाकडे जाणारे रस्त्याच्या उजवीकडील बाजूस घरातील व गावातील लोकांनी शोध घेतला असता वावळ्याचा कोंड या ओहलाच्या मध्यभागी मोठ्या दगडावर मुलगी विवस्त्र व मृत अवस्थेत पडलेली रात्री 9.30 च्या सुमारास आढळून आली. कोणितरी अज्ञात स्थळी घेऊन जाऊन तिचेवर अतिप्रसंग करुन तिला जीवे ठार मारुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात आले.

सदर घटनेची माहिती रोहा पोलिस ठाण्यात मिळताच रायगड जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक अनिल पारस्कर, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सुर्यवशी, पोलिस निरिक्षक नामदेव बंडघर, यांनी लागलीच क्षणाचाही विलंब न लावता स्टाफसह घटनास्थळी धाव घेतली. गुन्ह्याची परिस्थिती लक्षात घेऊन पिडीत मुलीचे मृत शरीरावर मरणोत्तर तपाषणीकरिता तिचे शव जे.जे.रुग्णालय मुंबई या ठिकाणी पाठवून त्याच दरम्यान आरोपींना ताब्यात घेण्याकरीता जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस आणण्यात हातखंडा असलेल्या अधिका-यांना रोहा येथे बोलावून आठ तपास पथके तयार करुन तपासाची चक्रे वेगाने फिरवून रात्रीत घटनास्थळाचे आजूबाजूचे गावाचे संशयित इसमांकडे विचारपुस करुन 12 तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यामध्ये एका आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडे चोकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यास गुन्ह्याच्या तपास कामी अटक केली आहे. सदर अटक आरोपी याचेकडील या गुन्ह्यामध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का याबाबत तपास सुरु आहे. रायगड जिल्ह्यातील फॉरेन्सीक व्हँन चे मदतीने घटना स्थळावरील भौतिक पुरावे गोळा करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *