ना. म. जोशी विद्याभवन गोरेगाव माध्यमिक शाळेचा 10 वी चा निकाल 97.56% टक्के.; कु. सिद्धेश पाटील 99.40 टक्के गुण प्राप्त करुन प्रशालेमधून प्रथम

Share Now

594 Views

प्रतिनिधी (पियुष भोसले) ना.म. जोशी विद्याभवन गोरेगाव माध्यमिक शाळेचा 10 वी चा निकाल 97.56% टक्के लागला असून कु. सिद्धेश पाटील याने 99.40 टक्के गुण प्राप्त करुन प्रशालेमधून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

गोरेगाव शहरातील ना. म. जोशी विद्याभवन माध्यमिक शाळेचा १० वीचा निकाल 97.56% टक्के लागला असून शाळे मधून कु. सिद्धेश पाटील ह्याने 99.40 टक्के प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर. प्रतीक्षा ढोले हिने 99.00 टक्के प्राप्त करून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तसेच दिक्षा वारखंडकर हिने 96.40 टक्के प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळवला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन दिलीप शेट तसेच संस्थेचे सर्व विश्वस्त, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *