आज महाडमध्ये १५ जणांना कोरोना लागण, २१ झाले बरे, दोघांचा मृत्यू.

Share Now

809 Views

महाड (वार्ताहर) आज महाड मध्ये नव्याने १५ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २१ जन उपचार घेऊन बरे झाले आहेत. मात्र आज कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे.

महाड कोरोना युध्दात महाडकरांची सरशी होत आहे. आज महाडमध्ये २१ जनांनी कोरोनावर मात केली आहे. त्याच बरोबर १५ जनांना लागणही झाली आहे. यामध्ये कांबळे तर्फे बिरवाडी ३१ पुरुष, खरवली ४२ पुरुष, वामनस्मृती आपा.५० पुरुष, राजमुद्रा को.हौ.सो, काकरतळे ४६ पुरुष, गवळ‌आळी ६७, ६२ पुरुष, सीटीप्र‌ईड रेसी. १३ स्त्री व १० पुरुष, प्रभातकाॅलनी ४९ पुरुष, रोहीदासनगर ३९ पुरुष, महाड ३३ पुरुष, नडगाव ६२ पुरुष, हेरंभपार्क ३५ पुरुष, शिवकृपा प्रभातकॅलनी ४१ स्त्री व १८ पुरुष यांचा समावेश आहे. तर सनाशेख रुग्णालय ६५ पुरुष, पानसार मोहल्ला ४४ पुरुष या दोघांचा आज मृत्यू झाला आहे. महाड मध्ये एकुण १२६ रुग्ण उपचार घेत असुन, २५८ रुग्ण बरे झाले आहेत. तर अजुन पर्यंत २३ जनांचा मृत्यू झाला असुन ४०७ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *