मुरुड (अमूलकुमार जैन)
रायगड लोकसभा निवडणुकीसाठी यावेळी प्रथमच दिव्यांग कर्मचारी यांना मतदान प्रकियेत सामावून घेण्यात आले होते. त्त्याच दिव्यांग कर्मचारी यांनी निवडणुकीची कामगिरी उत्कृष्टपणे पार पाडली. प्रथमच निवडणूक प्रक्रियेत सामावून घेतल्याने अपंग कर्मचारी यांच्यामध्ये चैतन्य निर्माण झाले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या 032 रायगड या लोकसभा मतदार संघातील 192 अलिबाग विधानसभा मतदारसंघातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रकिया ही 23 एर्पिल 2019 रोजी पार पडली. यावेळी निवडणूक आयोगाने एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला.तो म्हणजे दिव्यांग मतदार केंद्र निर्मिती करून त्या ठिकाणी ज्या कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आली होती ते सर्व कर्मचारी हे दिव्यांग होती.
192 अलिबाग या विधानसभा मतदारसंघातील अलिबाग शहरातील मतदान केंद्र क्रमांक 158 चेंढरे 7 येथील सेंट मेरी या हायस्कूलमध्ये दिव्यांग मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली होती.या केंद्रात महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष साईनाथ पवार,महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष राकेश सावंत,संतोष माने,शैलेश सोनकर,लक्ष्मण पाटील,आप्पा काळेल आदी दिव्यांग कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. अलिबाग विधानसभा मतदारसंघात संघातील 158 चेंढरे 7 या दिव्यांग मतदार केंद्रात 1013 मतदार संख्या होती.तरी या मतदार केंद्रावर नियुक्ती करण्यात आलेल्या दिव्यांग कर्मचारी आणि अधिकारी यांनी मतदान प्रक्रियेत सक्रिय भाग घेऊन उत्कृष्टपणे जबाबदारीने वेळेवर आणि प्रथम मतदान पक्रिया पार पाडली.
निवडणूक आयोगाकडून यावेळी एक आगळावेगळा उपक्रम राबविला गेला.यामध्ये दिव्यांग मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली होती.या निवडणुकीत जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचारी यांनी स्वतः हुन निवडणूक प्रकियेत सहभागी होणार असल्याचे सांगितले असल्याने दिव्यांग मतदान केंद्राची निर्मिती ही चेंढरे 7 या ठिकाणी करण्यात आली होती.या केंद्रावर निवडणूक निरीक्षक,जिल्हाधिकारी यानी भेट देऊन त्यांनी त्यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. मतदान केंद्रावर कार्यरत असणाऱ्या दिव्यांग कर्मचारी यांनी जबाबदारीने काम करून सर्वप्रथम मतदान प्रकियेतील साहित्य हे नियंत्रण कक्षात पोहचविण्यात आले.अलीबाग विधानसभा मतदार केंद्रात 394 दिव्यांग मतदारयांनी मतदानाचा हक्क बजावला.