टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यास टाळाटाळ करणाऱ्याची गय केली जाणार नाही -आ भरतशेठ गोगावले

Share Now

579 Views

महाड वार्ताहर 

महाड तालुक्यात ९ गावे आणि ४१वाड्यांमध्ये एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात भिषण पाणीटंचाई जाणवू लागली असून ७गावे आणि २२वाड्यांना २ टँकर व्दारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे महाड तालुक्यात भेडसावत असणाऱ्या या भिषण पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी महाड पोलादपूर माणगावचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी महाड पंचायत समितीमधील शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे सभागृह्रामध्ये आढावा बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीत आ गोगावले यांनी तालुक्यात टंचाईग्रस्त गाव व वाडयांना पाणीपुरवठा करण्यात अथवा गावांचे आलेले पाणी पुरवठ्याचे प्रस्ताव जिल्हाधिकारी रायगड यांचेकडे पांठविण्यास टाळाटाळ दिरंगाई झाल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही असा सज्जड दम पंचायत समिती अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला         

या आढावा बैठकीस महाड पंचायत समितीच्या सभापती सपना मालुसरे उपसभापती सिद्धी खांबे बीडीओ गोडांबे राजिप सदस्य मनोज काळीज कर संजय कचरे पंस सदस्या मंमता गांगण माजीराजीप सदस्य निलेश ताठरे , शिवसेना तालुका प्रमुख सुरेश. महाडीक संपर्क प्रमुख विजय सावंत सुभाष मालुसरे दासगांवसरपंच सोन्या उकीर्डे वहूर सरपंच जितेंद्र बैयकर आदी उपास्थित होते         सुरवातीस गटविकास अधिकारी गोडांबे यांनी तालुक्यातील पाणीटंचाई परिस्थितीची माहिती आ गोगावले यांना दिली महाड तालुक्यात ७ गाव व २२ वाड्यांना २ टॅंकर व्दारे पाणीपुरवठा सुरू असून २गाव व १९वाज्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडे मंजुरीसाठी पाठविले असल्याची माहिती दिली त्याचबरोबर ६४ बोअरवेल मंजूर झाल्याचे सांगितले यावर राजिप सदस्य संजय कचरे व माजी सदस्य निलेश ताठरे यांनी ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठा करण्यासाठी आलेले प्रस्ताव गटविकास अधिकारी यांच्या टेबलावर आठ आठं दिवस पडून असतात टंचाईग्रस्त गावांना तातडीने पाणीपुरवठा व्हावा यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी कोण कोणत्या गाव वाड्यांना भेट देऊन पाहणी केली याची माहिती सभागृहाला द्यावी अशी मागणी केली मात्र या मागणीचे उत्तर देण्यासाठी गटविकास अधिकारी कॉन्फरन्स कॉल सुरु असल्याने सभागृहामध्ये बैठकीला हजर नव्हते       

शासनाकडून मंजूर झालेल्या बोअरवेलची खोदाई करून पंप बसवल्यानंतर त्याची बिल शासनास सादर केल्यानंतर त्याचा निधी प्राप्त होत असतो त्यामुळे शासनाकडून प्रत्येक बोअरवेलला मिळणारे रु ५८ हजार ७८६ रुपये निधी मिळत असून त्यासाठी येणारा अतिरिक्त खर्च त्या त्या गणातील ‘जिप सदस्य पंस सदस्य ग्रामपंचायतीने करावा असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला या बैठकीत दासगांव वहूर व केंबुर्ली या गावांना गांधारी नदितुन पाणीपुरवठा  व्हावा यासाठी कोथुर्डे धरणातून पाणी सोडावे अशी मागणी दासगांवचे सरपंच उकीर्डे व वहुरचे सरपंच बैकर यांनी केली यासाठी इरीगेशन विभागाकडे अर्ज केला असता हा अर्ज मंजूरीच्या फेऱ्यात आठ दहा दिवस अडकत असल्याने तो पर्यत गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते असे आ गोगावले यांच्या निदर्शनास आणून दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *