कोलाड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय

Share Now

541 Views

चिल्हे  (श्याम लोखंडे )  मुंबई -गोवा या राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या कोलाड आंबेवाडी नाक्यावर मोठ्या डोळाने उभा असलेल्या ग्रामीण रुग्णालयात पुरेशी वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत असून अनेक रुग्णांचा नाहक बळी जात असल्याचे संकेत मिळत आहेत,
         मुंबई -गोवा या राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या कोलाड मध्यवर्ती ठिकाणी आंबेवाडी कोलाड या ग्रामीण शासकीय दवाखान्यात चांगल्या प्रकारची वैद्यकीय सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे अपघातग्रस्त व आजारी रुग्ण यांच्यावर त्वरित उपचार होऊ शकत नाही .शिवाय अनेक खाजगी दवाखाने रविवारी बंद असतात त्यामुळे रुग्णांची तारांबळ व मोठी गैरसोय निर्माण होत आहे.
       या परिसरात भिरा पासून कोलाड व खांब या परिसरातील  सुमारे ७० ते ८० ग्रामीण भागातील असंख्य जनता कोलाड येथील मध्यवर्ती ठिकाणी बाजारपेठ,शाळा,कॉलेज ,तलाठी कार्यालय ,बँका,इतर कामासाठी येत असतात.अश्या वर्दलीच्या ठिकाणी दररोज लहान सहान अपघात होतात.परंतु कोलाड येथे पुरेशी वैद्यकीय सेवा या ठिकाणी उपलब्ध होत नसल्यामुळे अपघात ग्रस्थाना उपचारांसाठी मुंबई येथे हालवण्यात येते परंतु मुंबई -गोवा हायवे रस्त्यांची बिकट अवस्था पहाता अपघात ग्रस्ताचा रस्त्यात मृत्यु होतो त्यामुळे वारंवार घडणाऱ्या घटनांचा विचार करता संबंधीतानी व स्थानिक लोकनेते यांनी समन्वय साधून या अडचनीतून कसा मार्ग काढता येईल अशी मागणी येथील नागरिकांकडून कडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.