रोहा:( वार्ताहर)
रोहा पोलिसांनीअवघ्या 24 तासात पाईप चोरट्यांना जेरबंद केल्याची घटना समोर आली आहे. हे चोरटे दिड लाख रुपये किमतीचे अॅलीमिनीयमचे पाईप भंगाराच्या भावात विकत होते. हा चोरिचा माल विकणा-या व विकत घेणा-या तिघाना रोहा पोलिसांनी अवघ्या 24 तासात जेरबंद केल्याने रोहा पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
रोहा तालुक्यातील केलजाई येथील केलजाई रो हाऊसच्या बंद गोडाऊन एक लाख 42 हजार रुपये किमतीचे अॅलीमिनीयमचे पाईप चोरीला गेल्याची घटना घडली होती. केलजाई इको रिझर्व पारलीच्या रो हाऊसच्या पत्र्याच्या बंद गोडाऊन मध्ये हा माल ठेवला होता.या गोडाऊनच्या मागिल बाजुची खिडकी तोडून 15 मार्च ते 22 मार्च दरम्याण हा मुद्देमाल चोरीला गेल्याची नोंद रोहा पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.
यावर डी.वाय.एस.पी अमोल गायकवाड़ व पोलिस निरिक्षक राजेंद्रकुमार परदेसी यांच्या आदेशानुसार स.पो.नि.सचिन निकाळजे, पोलिस नाईक पाटील, पोलिस शिपाई मेंगाळ, गायकवाड़, वैभव जाधव या नियुक्त पथकाने तपासाला वेग आणत तालुक्यातील फणसवाडी गावातील लक्ष्मण शिद व रामा सुतक या चोरट्यांना प्रथमतः आपल्या ताब्यात घेतले. या दोघांची अधिक चौकशी केली असता त्यांनी ज्या भंगाराच्या दुकानात चोरिचा माल विकला त्या दुकानदाराला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयात या विषयाची पडताळणी झाली असता चोरट्यांना तीन दिवसीय पोलिस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंत चोरट्यांकडून 66 हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. यापुढील तपास पोलिस निरिक्षक राजेंद्रकुमार परदेसी यांच्या मार्गदशनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन निकाळजे करीत आहेत.
रोहा पोलिसांनी अवघ्या 24 तासात पाईप चोरट्यांना केले जेरबंद

584 Views