कोंकण विभागीय आयुक्तपदी श्री. अण्णासाहेब मिसाळ

Share Now

402 Views

नवी मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाने आज काढलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशात कोंकण विभागाच्या विभागीय आयुक्त पदावर श्री. अण्णासाहेब मिसाळ (भाप्रसे) यांची बदली करण्यात आली आहे.

अण्णासाहेब मिसाळ यांनी आज रोजी कोंकण विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकराला आहे. श्री. मिसाळ हे यापूर्वी नवीमुंबई महानगरपालिका आयुक्त म्हणून कार्यरत होते. अण्णासाहेब मिसाळ यांचा जन्‍म 13 जून 1961 साली झाला असून त्यांनी मराठवाडा विद्यापीठातून बीएससी (ॲग्रीकल्चर) व एमएसी (ॲग्रीकल्चर) केले आहे. श्री मिसाळ यांनी हेगच्या इन्टिट्यूट ऑफ सोशल स्टडीज कडून डेव्हलपमेंट स्टडीज ची पदवी प्राप्त केली आहे. 2004 सालच्या भाप्रसे बॅचमधून अधिकारी झाल्यानंतर उप आयुक्त (महसूल) कोकण विभाग या पदाचा कार्यभार त्यांनी सांभाळला. 2014 ते 2016 या कालावधीत त्यांनी जिल्हाधिकारी धुळे या पदावर उत्कृष्ट काम केले. मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या पदावर ते 2016 ते 2019 या कालावधीत ते कार्यरत होते.

आज श्री मिसाळ यांनी विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कोकण विभागात पर्यटन, पर्यावरण,फलोत्पादन आणि मत्स्यव्यवसाय याकडे भर असेल असे त्यानी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *