जय गणेश मित्र मंडळातर्फे 29 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबीर

Share Now

615 Views

अष्टमी (महेंद्र मोरे) रोहे तालुक्यातील मानाच्या गणेश उत्सवांपैकी असलेल्या भुवनेश्वर निरलॉन वसाहतीतील जय गणेश मित्र मंडळातर्फे शनिवार दि. 29 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष नितीन माने यांनी दिली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी समाजोपयोगी उपक्रम राबवत या वर्षीचा उत्सव साजरा करावा या प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करत या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदाचे विसावे वर्ष आहे. यावर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावा मुळे सर्वत्र गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत आहे.कोरोना व नुकत्याच घडलेल्या महाड येथील इमारत दुर्घटने मुळे रायगडसह संपूर्ण राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवु लागला आहे. याची दखल घेत आपले सामाजिक दायित्व जपण्यासाठी मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रोहा शहरासह तालुक्यातील जास्तीतजास्त युवा वर्गाने या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होत रक्तदान करावे असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. ज्यांना या उपक्रमात आपला सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी 7276444371 या नंबर वर आपली नोंदणी करावी.प्रशासनाने कोविडच्या धर्तीवर दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष नितीन माने यांच्या नेतृत्वाखाली प्रवीण शिर्के,दीपेश महाडीक,प्रथमेश घाग, महेश शिर्के, उमेश नाईक, सूचित पाटील, आदी विशेष परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *