पोलादपूर चरईत को.वि.सो.क्ष.कासार समाजोन्नती मंडळातर्फे रक्तदान शिबीर संपन्न

Share Now

652 Views

पोलादपूर (वार्ताहर) कोविड- १९ व अन्य जीवघेणे आजार, महामार्गावरील अपघात,तसेच अचानक घडण्या- या नैसर्गिक आपत्तीत अनेक जखमींचे प्राण वाचावेत म्हणून रक्ताची गरज लक्षात घेऊन तसेच सध्या राज्यासह कोकणांत रक्ताचा तुटवडा भासत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री उध्वजी ठाकरे यांनी रक्तदान करा !
असे केलेल्यां आवाहनाला प्रतिसाद म्हणून तर सोमवारी सायंकाळी महाड येथे ५ मजली इमारत कोसळून अनेक जण जखमी झाले त्या जखमीनां रक्ताची गरज पाहता कोकण विभाग सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजोन्नती मंडळ युवा मंचाने वेळेची जाण आणी सामाजिक भान लक्षात घेऊन प्रथमच बुधवारी पोलादपूर,चरई येथील कुलस्वामिनी माता मंदीरातील सभागृहात जिल्हा रुग्णालय शासकिय केंद्र रक्त पेढी अलिबाग यांच्या संयोजनाने महारक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.

या शिबीरास कोकण विभागातील कासार समाज बांधवासह अन्य समाज बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला. अशा विविध आपत्तीमध्ये सामाजिक बांधिलकी राखून समाजाकडून होणाऱ्या सामाजिक कार्याबद्दल पोलादपूर तालुक्यात जिल्हाभरातून कौतुक अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पोलादपूरचे नायब तहसीलदार समिर देसाई, जेष्ठ समाजसेवक विलासजी कासार, पंचायत समिती सदस्य यशवंत कासार,गणेश साळवी,दिपक कासार,वैभव मांगले डाॅ.गुलाबराव सोनावणे,श्रीराम मांगले,प्रकाश वारे,हनुमंत कासार,राजाराम वारे, सुभाष कासार, मनोहर कासार, अनिल मोहिरे, पत्रकार प्रमोद मोहिरे, सीमाताई कासार आदींसह अन्य मान्यवर या वेळी उपस्थित होते.

प्रारंभी कुलस्वामिनी कालिका मातेच्या मंदीरात ना.तहसिलदार देसाई व कासार यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व.श्रीफळ वाढवून रक्तदान शिबीराचे उदघाटन करण्यात आले.दरम्यान देसाई यांच्यासह कार्यक्रमाचे अध्यक्ष विलासजी कासार,पं.स.सदस्य यशवंत कासार यांनी मनोगत व्यक्त केली.या वेळी कोविड योध्दयांचा प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात आला.तर गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमास रायगड जिल्ह्यातील आसरे, महागांव, राजीवली, रानवडी, तूळशीसह अन्य गांवातील कासार समाज बांधवांनी उपस्थिती दर्शविली होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त शिक्षक अशोक कासार यांनी केले तर आभार मुरलीधर कासार यांनी मानले. रक्तदान कार्यक्रमात २६ बाॅटल रक्त गोळा झाल्याचे डाॅ.सोनावणे यांनी माहिती देताना यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.