समाजकल्याण विभागाचा सर्वाधिक निधी जनतेपर्यंत पोहोचविण्यात मनोज काळीजकर यशस्वी ; सभापती ममता गांगण

Share Now

399 Views

महाड (दीपक साळुंखे) रायगड जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत सर्वाधिक निधी महाड तालुक्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्यात जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर यशस्वी झाले असल्याचे प्रतिपादन माण पंचायत समितीच्या सभापती सौ ममता गांगण यांनी केले आहे. महाड तालुक्यातील लाभार्थ्यांना साहित्य वाटप तर आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना रायगड जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत निधीचे वाटप नुकतेच पंचायत समितीच्या बाळासाहेब ठाकरे सभागृहात करण्यात आले. याप्रसंगी सभापती ममता गांगण बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर सभापती सौ ममता उदय गांगण उपसभापती सदानंद मांडवकर जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, उदय गांगण, बाळू तांबडे, अशोक जाधव, आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी पुढे बोलताना सभापती ममता उदय गांगण यांनी महाड तालुक्यातील भावे, काळीज, कोथेरी, शेल, कुसगाव, खरवली, ढालकाठी या गावातील गवळी समाज, आदिवासी समाज, बेलदारवाडी समाज, भोई समाज, यामधील लाभार्थींना खुर्ची व कपाटाचे वाटत यासोबतच आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयाचा धनादेश सुपूर्त करण्यात आला.

रायगड जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या सदस्यपदी मनोज काळीजकर यांची वर्णी लागली असल्याने या विभागाचा सर्वाधिक निधी तालुक्यातील जनतेकरिता आणण्यासाठी जिप सदस्य काळीजकर यांची नेहमीच धडपड सुरू असते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाच्या नियमांचे पालन करून मदतीचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आल्याचे सभापती ममता उदय गांगण यांनी स्पष्ट केले. तर जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर यांनी सन 2017/18 सन 2018/19 सन 2019/20 या आर्थिक वर्षांमध्ये समाजकल्याण विभागामार्फत जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळवून दिला असल्याचे राजिप सदस्य मनोज कालेकर यांनी स्पष्ट केले. त्यासोबतच हायमॅक्स पथ, दिवे सौर दिवे, ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शिवसेनेचे आ. भरत गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असताना सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून आपली वाटचाल सुरू असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आजपर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी तालुक्यातील जनतेकरिता आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे जिप सदस्य मनोज काळीजकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *