शून्य कचरा गणेशा स्पर्धेचा निकाल जाहीर

Share Now

642 Views

महाड (वार्ताहर) महाड तालुका व महाड शहर या ठिकाणी शृंखला या पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या संस्थेची शुन्य कचरा गणेशा स्पर्धा नुकतीच घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.
या स्पर्धेत सजावटी चे सामान, मूर्ती यांचे उत्सवा नंतर विसर्जन कशाप्रकारे केले, निर्माल्याची योग्य ती विल्हेवाट केली का, सर्व कचरा पुनर्रनिर्मित,पुन्हा उपयोगांतकेला का, गणेशोत्सव शून्य कचरा या संकल्पनेतूनच झालाय ना या सर्व गोष्टींचे परिक्षण झाले.

या स्पर्धेचे हे पाहिलेच वर्ष असूनही खूप चांगला प्रतिसाद मिळाला.महाराष्ट् तून जवळपास 22 स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धकांनी त्यांची पूर्ण कल्पकता वापरून कुठलाही साहित्याचा कचरा निसर्गात वाया जाणार नाही याची खबरदारी घेऊन त्याचे रिसायकलिंग खुप सुंदर रित्या केले. या स्पर्धेचे आयोजक म्हणून शृंखले चे युवा कार्यकर्ते भक्ती तलाठी व तन्मय मेहता यांनी चोख कामगिरी बजावली. तसेच या स्पर्धेसाठी लागणारी तान्त्रिक मदत शुंखला च्या सस्थापक अस्मिता शर्मा यांनी खूप छान केली. तसेच या स्पर्धेचे परिक्षण पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेले दोन दिगग्ज अर्थात प्रज्ञाताई भिडे पुणे व लोकेश बापट पुणे यांनी उत्तम प्रकारे केले असून त्यांनी योग्य तो निकाल दिला आहे.
अशाप्रकारे ही एक स्पर्धा नसून तो एक जन जागरण होते. म्हणजेच जनजागृती होय. या स्पर्धेतून प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जात आहे. तसेच विजयी उमेदवाराला शृंखला तर्फे घरपोच असे बक्षीस दिले जात आहे.

ही स्पर्धा म्हणजे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने उचललेले मोठे पाऊल आहे असे म्हणता येईल.या स्पर्धेला सगळ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. या प्रतिसादातून शृंखला च्या कड्या अजून जास्त भागातून जोडल्या गेल्या आहेत. या स्पर्धेचे नियोजन शृंखले महाड च्या सर्वेसर्वा ममता महेता यानी व साक्षी उपाध्ये यांनी लिखित स्वरूपातील माहिती प्रसारित करुन जाहिरात विभागाचे काम पाहिले. शृंखला ची पूर्ण टीम व पर्यावरण विषयी जनजागरण हे एक अतूट असे नाते आहे हे या स्पर्धेतून अगदी सशक्तरित्या दाखवून दिले आहे.या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक प्रणाली वनारसे. महाड.द्वितीय पारितोषिक रत्ना पाटिल.मुंबई, तृतीय पारितोषिक प्रशांत परांजपे, दापोली उत्तेजनार्थ. …प्रियवंदा तबोटकर, श्री. पाटिल, प्रतिक दोशी, नेहा मेहता यांना प्रदान करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *