कर्जतमधील के.ई.एस इंग्लिश मिडीयम स्कूलच्या कारभाराविरोधात विद्यार्थ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू….

Share Now

702 Views

कर्जत (जयेश जाधव)
कर्जत इंग्लिश मिडीयम स्कुल मधील दहावीच्या विद्यार्थ्यांचे गायन आणि चित्रकलेचे गुण शाळेने बोर्डाकडे विलंबाने पाठविल्याने माध्यमिक बोर्डाने गुण स्वीकारण्यास नकार दिल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या हक्काचे गुण मिळालेच पाहिजे तसेच या चुकीला जबाबदार असलेल्या शाळेच्या व्यवस्थापनावर कारवाई झाली पाहिजे यासाठी गुरुवारी काळपासूनच कर्जत टिळक चौकात विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू असून यामध्ये पालकही सामील झाले.शाळेच्या मुख्याध्यापकाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना आता चित्रकला आणि गायनाचे अतिरिक्त गुण मिळणार नाहीत. शाळेने झालेली चूक मान्य करत काही दिवसांपूर्वी बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांची भेट घेऊन याबत चर्चाही केली होती तसेच शिक्षण मंत्री विनोद तावडेनाही शाळेच्या व्यवस्थापनाने साकडे घातले होते मात्र त्याचाहि काहीही उपयोग झाला नाही.
या सर्व प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी पालकांनी मागील आठवडयात शाळेच्या व्यवस्थापना बरोबर बैठक घेतली आणि घडलेल्या प्रकाराबाबत जाब विचारला मात्र त्यातूनही काहीच साध्य झाले नाही त्यामुळे अखेर संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी गुरुवारी सकाळी टिळक चौकात बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. यामध्ये युसूफ खान , विजय जगताप, कैलास पोटे, चंद्रकांत दगडे, सुभाष पाटील, हमीद खैराट, भास्कर सूर्यवंशी, कल्याणी पोटे, दर्शना दगडे, भावना ओसवाल, रुपाली कोकरे, प्रकाश घारे आदी पालक उपस्थित होते .
पालक संघर्ष समितीच्या प्रमुख मागण्या :
——————————-
1. एलिमेंटरी इंटरमिजिएट व विविध कलागुणांचे इयत्ता दहावीच्या 56 विद्यार्थ्यांचे वाढीव गुण मिळणे .
2 . शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये सुधारणा करणे.
3. दरवर्षी वाढविण्यात येणाऱ्या फि वाढीवर निर्बंध आणणे .
4. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना होणारा मानसिक त्रास थांबवणे ,शाळेतील शिक्षकांची मुले व इतर मुलांच्यात केला जाणारा भेदभाव थांबवणे.
5 .दरवर्षी नियुक्त केल्या जाणाऱ्या पालक प्रतिनिधींना व शाळा व्यवस्थापन समिती वरील पालकांना विशेषाधिकार मिळावेत .
6 .शाळेतील शिक्षकांची शैक्षणिक पात्रता तपासून प्रशिक्षित शिक्षकांची नेमणूक करणे
7 .शाळेचे मुख्याध्यापक व संचालक मंडळावर कारवाई होऊन संचालक मंडळाने राजीनामा देणे.
प्रतिक्रिया :
बोर्डाने दोन वेळा मुदत वाढ देऊन सुद्धा त्या वेळेत शाळेच्या मुख्याध्यापकांनी बोर्डाकडे मुलांचे गुण पाठवले नाहीत. यामुळे आमचे मुले अडचणीत आलीत. मात्र आम्ही काहीही झाले तरी मुलांचे नुकसान होऊ नये याकरिता आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ.– मृणाल कदम (उपोषणकर्ती पालक)
—————————
प्रतिक्रिया :
शाळेने हलगर्जी पणा केलाय. त्यांच्या चुकीची शिक्षा आम्हाला नको. तरी बोर्डाने ते मार्क स्वीकारावेत. कारण ते आमच्या हक्काचे मार्क आहेत.— श्रद्धा पोटे (उपोषणकर्ती, विद्यार्थी)
—————————–
प्रतिक्रिया : शाळेचे व्यवस्थापन फी च्या बाबतीत कडक धोरण अवलंबते. दरवर्षी शाळेची फी वाढवते. मात्र विद्यार्थ्यांना योग्य सुविधा देत नाहीत. त्याबाबत शाळा मौन बाळगते. हे चुकीचे आहे. तरी शाळेने दरवर्षी फी वाढवणे बंद करावे.–सुवर्णा कडू (उपोषणकर्ती, पालक)
—————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *