यश घरटकर सारखे कलाकार महाडचे वैभव

Share Now

573 Views

महाड (प्रतिनिधी) महाडची ऐतिहासिक भूमी ही अनेक नररत्नांची खाण असून या भूमी मधून अनेक स्वातंत्र्य सेनानी कलाकार पत्रकार गीत कार अभिनेते घडले आहेत महाडचा हाच वारसा उद्याचा उदयोन्मुख चित्रकार यश घरटकर हा जपत असून यशच्या कुंचल्यातून अप्रतिम अशा कलाकृती घडत आहेत यश सारखे कलाकार हे महाडचे खरे वैभव असल्याचे उदगार महाडमधील समाज सेवक दानशूर व्यक्तीमत्व श्री लादुलाल जैन यांनी काढले.

महाडमधील ज्येष्ठ पत्रकार संतोष घरटकर यांचे सुपूत्र यश घरटकर याने काढलेल्या अनेक मान्य वर व्यक्ती युग पुरुष सिने कलाकार यांची सिसपेन्सिल ने काढलेली चित्रे पाहिल्यानंतर महाड च्या या उदयोन्मुख कलाकाराच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी समाज सेवक लादुलाल जैन यांनी यश घरटकर याला छोटी भेट वस्तु देऊन छोटेखानी गौरव केला याप्रसंगी पत्रकार संतोष घरटकर हे देखील उपस्थित होते.

यावेळी लादुलाल जैन यांनी यश घरटकर याचा आदर्श भावी पिढीने घेत आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे जो छंद लहान पणा पासून आहे तो छंद ती आवड मना पासून जोपासून त्यात करीअर करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले भविष्यात यश घरटकर हा चित्रकलेच्या क्षेत्रात इतिहास घडवून महाडचे नाव उज्वल करील असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी यशला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *