रोहा तालुक्यातील सबंध मराठा समाज बांधवांनी सकल मराठा समाजाची सभासद नोंदणी करावी, अध्यक्ष प्रदीप देशमुख यांचे आवाहन

Share Now

330 Views

रोहा (वार्ताहर) सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने संपूर्ण महाराष्ट्रात समाजामध्ये जनआक्रोश निर्माण झाला आहे. त्यातच सरकारने पोलीस भरती जाहीर केल्याने समाजा बांधवांच्या जखमेवर मीठ चोळण्याने सर्वत्र ठिय्या आंदोलन झाली.मात्र मराठा आरक्षणाची लढाई अशीच सुरू राहणार असून अशा ऐतिहासिक लढ्याला समोरे जाण्यासाठी तालुक्यातील मराठा समाजाच्या बंधू,भगिनींनी आपल्या न्याय व हक्क उत्कर्षासाठी रोहा तालुका सकल मराठा समाजाचे सभासद व्हावे असे आवाहन अध्यक्ष प्रदीप उर्फ आप्पा देशमुख यांनी केले आहे.

सकल मराठा समाजाच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलने व न भूतो ना भविष्यती असे झालेले मराठा क्रांती मोर्चे आजवर जगाने उघड्या डोळ्याने पाहिले आहेत.शांतीच्या मार्गाने क्रांती करीत मराठ्यांनी राज्यात इतिहास घडविला आहे.समाजातील अनेक ज्येष्ठ मंडळीनी आरक्षणासाठी आपली बाजी पणाला लावली आहे.या आरक्षणाचा फायदा जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचावा म्हणून सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे. खासकरून ग्रामीण भागातील अज्ञानी, अनभिज्ञ अशा मराठा शेतकऱ्यांपर्यंत या आरक्षणाचे लाभ गेलेच पाहिजेत.तरच या आरक्षणाचा मूळ हेतू साध्य होईल असेही ते म्हणाले. जो पर्यंत मराठा आरक्षण वरील स्थगिती उठत नाही तो पर्यंत पोलिस भरती सह कुठलीही भरती होता कामा नये तसेच पुढील महिन्यात एम.पी.एस.सी. ची परीक्षा होणार आहे ती पुढे ढकलावी.२०१९ च्या एम.पी.एस.सी उत्तीर्ण अधिकाऱ्यांना तत्काल नियुक्ति देण्यात यावी. २०१४ च्या ३५०० हजार मराठ्याना नोकरीत सामावून घेणे.आणि सुप्रीम कोर्टात लवकरात लवकर मराठा आरक्षण वरील स्थिगिति उठवावी.जो पर्यंत नोकर भरती रद्द होत नाही व् आरक्षण वरील स्थगिती उठत नाही तो पर्यन्त आंदोलन चालूच राहतील असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.

सकल मराठा समाज रोहा या नावाने महाराष्ट्र/११८/२०१९/रायगड नोंदणीकृत असून या माध्यमातून मराठा भवन, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सारथीच्या धर्तीवर अभ्यासकेंद्र,वसतिगृह,महिला सक्षमीकणासाठी विविध योजनांचे मार्गदर्शन शिबिरे,विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने सामजिक,शैक्षणिक उपक्रम,ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष उपक्रम त्याचबरोबर आणासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, डॉ.पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजनांचा लाभ व यासाठी मार्गदर्शन,त्याच प्रमाणे लाभार्थ्याकरीता विविध शैक्षणिक दाखले यासाठी आम्ही काम करणार आहोत. याकरिता जीवन देशमुख (शेणवई),अमोल देशमुख (पिंगळसई),महेश सरदार,राजेश काफरे,प्रशांत देशमुख,नाना दळवी,भाई दळवी,अरुण चव्हाण(रोहा),सुहास येरूनकर(वरसे),संदीप सावंत व चंद्रकांत पार्टे(भालगाव)यांसह इतर विभागातील पदाधिकाऱ्यांकडे नोंदणी करण्याची जबाबदारी सोपविली आहे. तरी तळागाळातील जास्तीत जास्त समाज बांधवांनी सकल मराठा समाजाची सभासद नोंदणी करावी असे प्रदीप देशमुख यांनी शेवटी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *