रोहा कोलाड राज्यमार्गावर डांबर व खडीचा तात्पुरता मुलामा, वाहनचालकांमध्ये संताप, लोकप्रतिनिधी लक्ष कधी घालणार ? नागरीकांचा सवाल

Share Now

355 Views

रोहा (रविंद्र कान्हेकर) रोहा कोलाड राज्य मार्ग गेली दोन वर्ष चर्चेचा विषय बनला आहे. या मार्गावर दरवर्षी खड्डे भरण्यासाठी लाखो रुपायांची बिले काढली जातात मात्र रस्त्याची दुरावस्था झालेलीच दिसते. या रस्त्यासाठी सामाजिक संस्था व पत्रकार एकत्र येत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयासमोर दोन वर्षापुर्वी आंदोलन केले होते. मात्र खात्याचे अधिकारी देवकाते यांनी आश्वासनाशिवाय काहीही दिले नाही. महत्वाचे म्हणजे याउलट सार्वजनिक बांधकाम खात्याने लाखो रुपायांची बिले मात्र तात्पुरत्या खड्डे भरणाची काढली. यामुळे नागरीक व वाहनचालक यांच्यामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या रस्त्याच्या प्रलंबित प्रश्नांसंबधी लोकप्रतिनिधी लक्ष कधी घालणार असा सवाल नागरीक विचारत आहेत.

रोहा कोलाड राज्य मार्गावर गेल्या महिन्यात ग्रीट टाकल्याने रस्त्यावर धुळीचे साम्राज्य तयार झाले आहे. त्यामुळे दुचाकी, पादचारी व चारचाकी गाड्या या मार्गावर प्रवास करत असताना धुळीचे आवरण साचते. महत्वाचे म्हणजे दुचाकीस्वार व पादचारी यांच्या नाकातोंडात धूळ जात असल्याने त्यांना दमा व खोखल्याचे आजार झाल्याचे समोर आले. रोहा कोलाड राज्य मार्गाच्या मधोमध धाटाव येथे मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आहेत. येथे काम करण्यासाठी हजारो लोक कोलाड, नागोठणे, रोहा, चणेरा व आसपासच्या परिसरातून येत असतात. त्यांच्या येण्याजाण्याचा मुख्य रस्ता हा रोहा कोलाड राज्य मार्ग आहे. या मार्गावर खड्डे मोठ्या प्रमाणात असल्याने गेल्या महिण्यात ग्रीट टाकण्यात आली. मात्र आता उन्हाळा असल्याने याच रस्थ्यावर टाकलेल्या ग्रीटचा धुरळा झाला आहे.

सार्वजनिक बांधकाम खाते दरवर्षी लाखो रुपये नुसते खड्डे भरण्यासाठी काढतात. मात्र रस्त्यावरचे खड्डे तसेच राहतात. शासनाकडून निधी मात्र येतो पण अधिकारी रस्त्याची डागडूजी व्यवस्थीत झाली आहे कि, नाही हे न पाहताच ठेकेदाराला बील देतात असेच घडते. त्यामुळे रस्त्याची अवस्था जैसे थे राहातेच कशी हे लोकप्रतिनिधींने पाहणे गरजेचे आहे. रोह्यातील पत्रकार, अनेक सामाजिक संस्था रस्त्यासाठी एकत्र येऊन याबाबत आवाज उठवत असतात मात्र तेव्हड्या पुरती सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी समोर येऊन आश्वासन देतात आणी करत मात्र काही नाहीत.

महत्वाचे म्हणजे अश्या नाकर्त्या आधिका-यांना धारेवर धरुन लोकप्रतिनिधीनी रस्त्याची कामे करुन घेणे गरजेचे आहे. रोहा – कोलाड, रोहा- चणेरा, रोहा- अलीबाग या मार्गावर खड्ड्याशिवाय काही उरलेले नाही. जनता मात्र आश्वासनावर तक धरुन राहिली आहे. वाहनचालक व प्रवासी येता जाता सार्वजनिक बांधकाम खात्याचे वावढ़े काढत आहेत. रोहाला जोडणारे राज्यमार्ग मंजूर झाले आहेत. आता पावसाळाही संपलेला आहे मग अधिकारी कुठल्या नेता भुमिपुजनाला येतो याची काय वाट पाहात आहेत काय? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. याऊलट ज्यांना भुमिपुजनाला यायच असेल त्यांनी रस्ता तयार झाल्यावर उद्घटनाला या असे जनतेतून बोलले जात आहे. पण अधिका-यांनो रस्त्याची पाहिले कामे पक्की करा अशी आर्त हाक नाकरिकांतून मारली जात आहे.

महत्वाचे म्हणजे शुक्रवारपासून कोलाड मार्गे रस्त्याचे तात्पुरते खड्डे भरण होत आहे. हे भरत असताना खड्ड्यात डांबर टाकणे आवश्यक आहे मात्र फक्त खडी टाकून खडीवर डांबर टाकून सार्वजनिक बांधकाम खाते जनतेची दिशाभूल करत आहे हे थांबवावे असे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *