इंदापुर विभागात गुरे कापून मास घेणारी टोळी दाखल, शेतकऱ्यांन मध्ये संतापाची लाट

Share Now

493 Views

इंदापुर (गौतम जाधव) इंदापुर विभागातील वावेदिवाळी या गावातील या आठवड्यात सहा ते सात गुरे गायब झाली असून यामध्ये काही शेतकरी ग्रामस्थाच्या गाई व बैल असून काही वावेदिवाळी येथे गोवा हायवे लगत असलेल्या गो शाळे मधी देखील चार पाच गाई बैल गेल्या साह ते सात दिवसापासून गायब झाल्या आसल्याची बोब चालूच आसताना यामधील दोन गुरे ही वावेदिवाळी, रातवड, धरणाची वाडी व निळज गावच्या मध्ये भागीच्या हद्दीमध्ये गोवा हायवेच्या अगदी लगत तिन ते चार दिवसा पूर्वी एक बैल व गाई चोरट्यानी कापून त्यांचे मास घेऊन काही पोटाचा भाग झाडीमध्ये त्या ठिकाणी टाकून ही टोळी पसार झाली आहे. या भयानक प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

ज्या ठिकाणी हा गुरे कापण्याचा प्रकार घडला आहे.
त्या ठिकाणी मोठा रक्ताचा पाट गेला असून दोन गुराचे दोन दावे तसेच एक गळ्यातील दोरा पडला असुन त्याचे आरदे पाय देखील तोडून त्या ठीकाणी ठेवले होते तसेच पोटाचा भाग काढून गवता मध्ये फेकून दिला असल्याचे दिस असून हा सर्व घृणास्पद प्रकार पाहून इंदापुर परीसरातील शेतकरी ग्रामस्थान मध्ये एकच संतापाची लाट निर्माण झाली असून परत आपल्या गुराची देखील अशीच चोरटे कत्तल करतील कि काय अशी घबराट देखील पसरलेले आहे.               

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *