खोपोली जवळील रासायनिक लघु उद्योगामध्ये स्फोटामुळे शेजारील सहा लघु उद्योग आगित भस्मसात, दोन ठार तर आठ जखमी

Share Now

578 Views

खोपोली (संतोषी म्हात्रे) गुरुवार दि.०५/११/२०२० रोजी पहाटे ०२-४० च्या सुमारास आरकोस इंडस्ट्रियल प्रिमायसेस सहकारी संस्था, ढेकू मधील प्लॉट नंबर -26, जेसनोवा फार्मसिटिकल अँड स्पेशॅलिटी केमिकल्स मध्ये शक्तिशाली स्फोट झाला आहे.

या स्फोटामध्ये वैष्णवी उर्फ सपना कृष्णा निवबाने वय-३२, अन्वर खान, बेस्टो कंपनी सुरक्षा रक्षक हे मयत झाले आहेत. तसेच कृष्णा प्रसाद नुबाने-४०, कीर्ती कृष्णा नुबाने-१५ महिने, आरती कृष्णा नुबाने-११,आशिष कृष्णा नुबाने-९, बिष्णोई कृष्णा नुबाने-३५, गिरीष परदेशी गौडा-४४, सागर रमेश कोंडीलकर-२३, नथू जाणू पवार-३० हे जखमी झाले असून त्यांच्यावर नगर परिषद, खोपोली रुग्णालय येथे उपचार करण्यात येऊन जखमींना सोडण्यात आले आहे. तालुक्यातील खोपोली नगरपरिषद, रिलायन्स, उत्तम स्टील, टाटा स्टील, पनवेल महानगरपालिका इत्यादींच्या अग्निशमन दल पथकांमार्फत आग विझविण्याचे काम करण्यात आले तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्था_साठेलकर ग्रुप, NGO, स्थानिक सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी, प्रतिनिधी, सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक यांच्यामार्फत प्रयत्न चालू आहेत.

घटनास्थळी पोलीस अधीक्षक अशोक दुधे, वैशाली परदेशी, उपविभागीय अधिकारी कर्जत, खालापूर तालुका तहसिलदार इरेश चप्पलवार, उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर, पोलीस निरीक्षक खोपोली व खालापूर हे उपस्थित आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहे. पुढील अधिक तपास पोलीस यंत्रणेमार्फत सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.