जागतिक कराटे दिनाचे औचित्य साधून 100 काता चॅलेंज रायगडचे सुपुत्र सेनसई निलेश मनोहर यांना बहाल

Share Now

414 Views

रोहा (उद्धव आव्हाड) जगभरात 25 octomber हा जागतिक कराटे दिवस पाळण्यात येतो.व कराटेचे उगमस्थान उकिनावा या जपानमधील प्रसिद्ध शहरात 100 काता उपक्रम करून साजरा केला जातो.यावर्षी भारतामधून तूरलक कराटेपट्टूनी यामद्धे सहभाग घेतला होता.त्यामद्धे रोहा निवासी सेनसई निलेश मनोहर(6th Dan black belt) यांनी कठीण अश्या जागतिक नामांकन यादीमध्ये प्रवेश मिळवून 100 काता चॅलेंज यशस्वीपणे पूर्ण केले होते.

ही स्पर्धा जागतिक स्थरावर दिनांक-25 october 2020 रोजी online live होती. हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी त्यांना 5 तास अवधी लागला. या चॅलेंज साठी त्यांनी कुरुरु नफा हा गोजुरीऊ या कराटे शैलीतील प्रगत काता निवडला होता. सेनसई निलेश मनोहर हे इंटरनॅशनल सइशिनकाय कराटे युनियन ISKU या अंतरराष्टीय कराटे organisation चे भारतीय होउचो म्हणजे राष्टीय प्रमुख आहेत तसेच भारतातील होतुडोजो म्हणजे राष्टीय मुख्य प्रशिक्षय हे रोह्यात यशोदीप नगर रोठ येथे आहे.

ISKU चे जागतिक प्रमुख कैचो रॉबर्ट बर्जर मैसर (8th dan black belt) यांनी 2017 साली सिहान म्हणजेच master of masters अशी पदवी सेनसइ निलेश मनोहर याना 2008 साली स्कॉटलंट येथील राष्ट्रकुल कराटे स्पर्धेतील आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे व 30 वर्षाच्या कालखंडात हजारो पेक्षा जास्त खेळाडू त्यांनी घडवले आहेत,व घडवत आहेत. निलेश मनोहर हे मेकॅनिकल इंजिनिअर असून रोह्यातीळ नामांकित अश्या मझदा colours limited ह्या कंपनीत मॅनेजर पोस्टवर कार्यनवीत आहे. ह्या अतिशय कठीण अश्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या यशाबद्दल सम्पूर्ण भारताचे ते रोह्याचे सुपुत्र असून सर्व स्तरातील मित्र परिवार स्नेही कडून कौतुक ऐकायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *