ब्राह्मण मंडळ रोहा तर्फे त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात साजरी

Share Now

569 Views

रोहा (वार्ताहर) ब्राह्मण मंडळ रोहा तर्फे रविवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी श्री ओंकारेश्वर मंदिर येथे सायंकाळी सहा वाजता त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. कोव्हिड 19 च्या सर्व प्रचलित नियमांचे पालन करुन हा उत्सव साजरा करण्यात आला.

ब्राह्मण मंडळ रोहाचे अध्यक्ष हेमंत ओक यांच्या सक्षम नेत्रुत्वाखाली संपन्न झालेल्या या उपक्रमाचे उपस्थित समाजबांधवांनी विशेष कौतुक केले. यावेळी सौ. मनिषा किंजवडेकर यांनी रेखाटलेली सुबक रांगोळी विशेष लक्षवेधी ठरली. मंडळाचे कार्यकारिणि सदस्य सागर ओक व सौ. संस्कृती ओक यांनी सोहळ्याचे यजमानपद भूषवले तर वे. मु. कुमार क्षीरसागर यांनी सोहळ्याचे पौरोहित्य केले.

सदर उत्सवासाठी रोहे अष्टमी नगरपरिषदेचे गटनेते महेंद्र दिवेकर, सभापती अहमदशेठ दर्जी, नगरसेवक महेंद्र गुजर,क्लेरीयंट केमिकल्सचे व्यवस्थापक प्रविण गवळी, भाटे वाचनालय अध्यक्ष किशोर तावडे आदींसह बहुसंख्य समाजबांधवांनी हजेरी लावली. सोहळा यशस्वी होण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष हेमंत ओक, उपाध्यक्ष अमित आठवले, सचिव आनंद काळे, सह सचिव प्रकाश कुंटे, खजिनदार चैतन्य आठवले, कार्यकारिणी सदस्य निखिल दाते, सुरेंद्र आगरकर,मोहन साठे,सागर ओक, श्रीकांत पिंगळे, बळवंत पेंडसे, मंदार भाटे,महिला कमिटी अध्यक्षा गौरी गांगल, विद्या कमलाकर, प्राची जोशी, भाग्यश्री रत्नपारखी, श्रेयसी गांगल, मानसी साठे, मानसी दाते आदींसह सर्व कार्यकारिणी सदस्य व समाजबांधवांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *