अखेर म्हसळयातील वाहतूक कोंडीवर निघाला तोडगा: १५ डिसेंबर पासून वनवे होणार शहरातील रस्ता

Share Now

861 Views

म्हसळा(निकेश कोकचा) म्हसळा आणि वाहत वाहतूक कोंडी हे समीकरण शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील एक भाग झाला होता.वाहतूक कोंडी पासून कधी सुटका होणार हा प्रश्न नागरिकांना वारंवार भेडसावत होता. मात्र आता या वाहतूक कोंडीवर तोडगा निघाला असून १५ डिसेंबर पासून म्हसळा शहरातील रस्ता वन वे होणार असल्याचे म्हसळा पोलीस ठाण्यात घेण्यात आलेल्या सभेत जाहीर झाले.

म्हसळा शहरातील अरुंद रस्ते, वाढती रहदारी, एसटी बसेसेच्या दुतर्फी फेर्या, वाहनाची वाढणारी संख्या व पर्यटक यांच्यामुळे शहरात वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढून वाहतूक कोंडी सोडवावी अशी मागणी शहरातील व्यापारी व नागरिक वारंवार प्रशासनाकडे करीत होते. नागरिकांच्या मागणी नुसार शरीवारी १२ डिसेंबर रोजी म्हसळा पोलीस ठाण्यात व्यापारी, रिक्षा चालक, टेम्पो चालक, मिनीडोर चालक व शहरातील नागरिक यांची संयुक्त विचारविनिमय सभा घेण्यात आली.या सभेमध्ये श्रीवर्धन कडून येणाऱ्या एसटी बस, टेम्पो व इतर मोठी पेसेंजर वाहतूक करणाऱ्या चारचाकी शहरातून जाईल.माणगाव गोरेगाव कडून येणारी एसटी बस व मोठी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या व पर्यटकांच्या गाड्या या बायपास ने जातील असा निर्णय घेण्यात आला.छोट्या गाड्यांना (पर्यटकांची वगळता) शहरातून दुतर्फा प्रवेश दिला जाईल. तळा माजगाव मार्गे येणाऱ्या एसटी बस देखील बायपास फिरून शहरात येतील असे म्हसळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांनी सांगितले.

यावेळी पोलीस उप निरीक्षक दीपक धूस,पोलीस उप निरीक्षक सूर्यवंशी, हिंदू समाज अध्यक्ष बाळशेट करडे,व्यापारी अध्यक्ष नंदूशेट सावंत,पत्रकार संघाचे अध्यक्ष शशिकांत शिर्के,जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे,मिनीडोर संघटनेचे अध्यक्ष मनोहर तांबे,उपाध्यक्ष नदीम दळवी,रिक्षा युनियन उपाध्यक्ष सादिक दरोगे,व्यापारी फरीद मेमन,कांतीलाल जैन, जब्बार राजपूत, खान्गार्सिंग राजपूत, अनिकेत पानसरे, संतोष पानसरे, जीप लाईनचे पप्पू जावळे, नंदेश ढवळे,अनिल ढवळे व शहराती नागरिक व वाहन चालक उपस्थित होते.यावेळी सहायक पोलीस निरीक्षक पोरे यांनी वाहतूक नियम तोडणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे देखील उपस्थितांना सांगितले.या सभे मध्ये नगरपंचायतला पत्र देऊन देखील कोणीही उपस्थित न राहिल्याने उपस्थित सर्वांनी नाराजी व्यक्त केली व वारीष्टांकडे तक्रार करण्याची मागणी केली.

दरम्यान, रोजगार निर्मित होणार- शहरातील एसटी बस वाहतूक व पर्यटक वाहतूक बायपास ने फिरवल्यास ३ नवीन रिक्षा स्टँडची निर्मित होणार.बायपास रस्त्यावर छोट्या व्यवसाइकांना मोठी संधी उपलब्ध होऊ शकते. या सोबत शहराचा विस्तारीकरण देखील होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *