रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान : आ. भरत गोगावले

Share Now

413 Views

महाड (दीपक साळुंखे) रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे प्रतिपादन महाड विधानसभा मतदारसंघाचे आ. भरत गोगावले यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद रायगड विभाग शाखा महाड पोलादपूर प्राथमिक शिक्षक यांच्या वतीने रक्तदान शिबीर महाड शहरातील जनकल्याण रक्तपेढीत येथे रविवार 13 डिसेंबर राेजी आयोजित करण्यात आले. यावेळी आ. गोगावले बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर आ. भरत गोगावले, राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे, विजय पवार, जिल्हा कार्यवाह वैभव कांबळे, जिल्हा संघटन मंत्री संजय कोंडविलकर, जिल्हा उपाध्यक्ष दिप्ती गावंड जिल्हा महिला आघाडी प्रमुख, भिकाजी मांढरे महाड तालुका अध्यक्ष, सचिन खोपडे तालुका कार्याध्यक्ष, बाळासाहेब बारगजे तालुका कार्यवाह स्मिता जोष्टे, समीर होडबे जिल्हा उपाध्यक्ष तालुका महिला आघाडी प्रमुख, मनोज सकपाळ पोलादपूर तालुका अध्यक्ष अरुण मोरे तालुका कार्यवाह सचिन दरेकर तालुका कार्याध्यक्ष नारायण कुंडले व्हा. चेअरमन सानेगुरुजी पतपेढी इत्यादी पदाधिकारी शिक्षक उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आ. भरत गोगावले यांनी संस्थेचे संस्थापक आ. संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असताना प्राथमिक शिक्षक आणि सामाजिक बांधिलकी ओळखत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामुळे रक्ताचा तुटवडा भरून काढण्यात मदत होईल. रस्त्यावर होणारे अपघात व इतर प्रसंगांमध्ये रक्ताची नितांत गरज असते ही गरज ओळखून जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत प्राथमिक शिक्षकांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद असून महाड पोलादपूर तालुक्यातील सुमारे चाळीस शिक्षकांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केले. त्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करताना निश्चितच देशातील जबाबदार नागरिकाचा सन्मान केल्याची भावना आ. गोगावले यांनी व्यक्त केली. भारतीय संस्कृतीमध्ये दान करण्याला विशेष महत्त्व आहे. मात्र रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. कारण यामुळे थेट कोणाचेही जीव वाचू शकतात असे आ. गोगावले यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *