रोहा तालुका काँग्रेस आय पक्षाची निवडणूक संदर्भात नियोजन सभा संपन्न

Share Now

386 Views

रोहा (याकूब सय्यद) रोहा तालुका काँग्रेस आय पक्षाची सभा आज दि. 25 दिसंबर रोजी रोहा शासकीय विश्रामगृह येथे दुपारी तीन वाजता संपन्न झली. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सध्‍या संपूर्ण रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली असताना त्या अनुषंगाने रोहा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात ही सभा रोहा तालुका अध्यक्ष निजाम भाई सय्यद यांनी आयोजित केली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी रायगड जिल्हा उपाध्यक्ष समीर सकपाल हे होते. या सभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष बशीर भुरे उपस्थित होते. त्यांचे स्वागत समीर सकपाल यांनी केले. तळा तालुकाध्यक्षा सौ. अकबरी गोटेकर, मन्सूर धनसे यांचा स्वागत रोहा तालुका अध्यक्ष निजाम सय्यद यांनी केले.

या सभेत येत्या ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात नियोजन करणे, पक्षसंघटना मजबूत करणे, आयत्यावेळी येणारे विषयी संदर्भात चर्चा विनिमय करणे बाबतचे विषयी घेण्यात आले. विधानसभा मतदारसंघाचे युवक अध्यक्ष मन्सूर भाई धनसे तसेच तळा तालुका अध्यक्षा सौ. अकबरी गोटेकर रिजवाना गोटेकर, सना रहाटविलकर, सिमरन रहाटविलकर, फिजा कारदोकर, रोहा पंचायत समिती सदस्य बिलाल कुरेशी, अल्पसंख्याक रोहा तालुकाध्यक्ष याकूब सय्यद, नागोठणे शहर अध्यक्ष अशपाक पानसरे, सुनील देशमुख, अल्ताफ चोरडेकर, जानू कोकरे, हेमंत साळवी, अनंत चव्हाण, रमेश साळवी, सागर कोठारी, जयंता पांचाळ, अमित चव्हाण, सरफराज शिंदी, नवीन हिंदी, मन्सूर कडवेकर, रुमान पानसरे, गणेश जगताप, सुरेश कोतवाल, विनोद सावंत, भरत कोतवाल तसेच जेष्ठ श्रेष्ठ महिला व युवक कार्यकर्ते या सभेत उपस्थित होते. दरम्यान, रोहा तालुक्यातील सध्या सर्वात प्रथम महत्वपूर्ण अशी ही सभा काँग्रेस आय पक्षाच्या कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची चैतन्यपूर्ण ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *