विकास शेठ गोगावले मित्रमंडळाने जिंकली क्रिकेट स्पर्धा. सलग दुसर्या वर्षी विजेतेपद कायम

Share Now

865 Views

महाड (वार्ताहर) डे नाइट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा विकासशेठ गोगावले मित्रमंडळ ढालकाठी संघाने जिंकत सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद कायम ठेवले आहे. दक्षिण रायगड युवासेना जिल्हा युवा अधिकारी विकास गोगावले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विकास शेठ गोगवले मित्रमंडळ ढालकाठी यांच्यावतीने डे नाइट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या क्रिकेट स्पर्धेमध्ये 32 संघांनी आपला सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे उद्घाटन ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या स्पध्रेला आमदार भरतशेठ गोगावले, माजी राजीप सदस्य सौ सुषमा गोगावले, राजिप सदस्य मनोज काळीकर, संजय कचरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेची अंतिम लढत विकास शेठ गोगवले मित्रमंडळ ढालकाठी संघ विरूध्द क्रांती ग्रुप महाड क्रिकेट संघ या दोन संघांमध्ये झाली या लढतीमध्ये विजय प्राप्त करीत विकासशेठ गोगावले मित्रमंडळ संघाने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद कायम राखले. तर क्रांती ग्रुप महाड क्रिकेट संघ या स्पर्धेचा उपविजेता ठरला. तृतीय क्रमांकाचा मानकरी सुनेभाऊ क्रिकेट संघ महाड, तर फार्माची वाडी क्रिकेट संघ महाड यांना चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले.

या स्पर्धेचा मालिकावीर म्हणून विकास शेठ गोगावले मित्रमंडळाचा खेळाडू वैभव मालुसरे याची निवड करण्यात आली तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अरबाज कारविनकर, उत्कृष्ट फलंदाज नंदू करकरे यांना सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यांकरिता युवासेना समन्वयक इम्रान पठाण, युवासेना तालुका सरचिटणीस शेखर राखाडे, ढालकाठी शाखाप्रमुख संतोष बडे, पत्रकार दीपक साळुंखे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेतील विजयी संघांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *