रोटरी क्लब रोहा सेंट्रल ‘बेस्ट क्लब’ पुरस्काराने सन्मानित

Share Now

286 Views

रोहा (वार्ताहर) रोहे शहर व परिसरात चांगले काम करणारी संस्था म्हणुन सुपरिचित असलेल्या रोटरी क्लब रोहा सेंट्रलला रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 मधील मानाचा ‘बेस्ट क्लब’हा पुरस्कार बहाल करण्यात आला.या पुरस्कारामुळे रोटरी क्लब रोहा सेंट्रलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चा सन 2019-2020 चा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच तत्कालीन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. रवी धोत्रे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी डिस्ट्रिक्ट 3131 मधे समाविष्ट असणाऱ्या पुणे व रायगड जिल्ह्यातील रोटरी क्लब मधून रोटरी क्लब रोहा सेंट्रलला ‘बेस्ट क्लब’चा किताब देवून गौरवण्यात आले. रोटरी क्लब रोहा सेंट्रलने क्लबच्या स्थापनेपासुनच सेवा प्रकल्पांवर आधिक भर दिलेला असून क्लबच्या माध्यमातून अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक,वैद्यकीय, क्रीडा उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे.
सन 2019-2020 या वर्षात क्लब प्रेसिडेंट गणेश सरदार यांच्या अध्यक्षतेखाली गर्भाशय मुखाचा कर्करोग प्रतिबंधात्मक लसीकरण, निर्माल्यापासुन खत निर्मिती प्रकल्प, कोरोना काळात रक्तदान शिबिराचे आयोजन,आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप, लॉकडाऊनच्या काळात गरजूंना धान्य वाटप, निसर्ग चक्रीवादळग्रस्त शाळांना पत्रे वाटप, रायगड मेडिकल असोसिएशनच्या हिल मेरेथॉनच्या यशस्वी नियोजनात सहभाग, आदी प्रमुख उपक्रमांसह 40 प्रोजेक्ट संपन्न झाले.

रोटरी डिस्ट्रिक्ट 3131ने सदर उपक्रमांची दखल घेवून रोटरी क्लब रोहा सेंट्रलला ‘बेस्ट क्लब’पुरस्काराने सन्मानित केले. सन 2020-2021 मध्ये देखील क्लब प्रेसिडेंट महेंद्र दिवेकर यांच्या सक्षम नेत्रुत्वाखाली क्लबची यशस्वी घौडदौड सुरू असुन अनेक लोकोपयोगी उपक्रमांची श्रुंखला सुरू आहे. या पुरस्कारामुळे काम करण्याची नवीन ऊर्जा मिळाल्याची प्रतिक्रिया सर्व क्लब सदस्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *