३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर माणगाव पोलिसांची वाढली गस्त ! फार्म हाऊस व रेव्ह पार्टीवर टेंट लावणाऱ्यावर करडी नजर

Share Now

317 Views

इंदापूर (गौतम जाधव) करोना माहामारीने  २०२० ह्या वर्षात संपूर्ण जगामध्ये थैमान घातले असताना गेले ९ महीने घरामध्ये अडकून पडलेली जनता आता २०२० ची सांगता करण्यासाठी गेल्या आठवड्याभरापासून पर्यटन स्थळांवरती गर्दी करीत आहेत. परंतु करोंनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नसल्याने व पुन्हा नव्या करोंनाचा प्रादुर्भाव होण्याच्या मार्गावर असल्याने शासनाने खबरदारी म्हणून  संचारबंदी घोषित केली असताना सुद्धा काही अतिउत्साही पर्यटक नियमांची जाणूनबुजून पायमल्ली करीत असतात. त्यामुळे मुंबई- गोवा महामार्गावर असलेल्या रस्त्यावर वाहतूक कोंडीचा फटका सर्वसामान्यांना बसत असतो. 

याबाबतीत आमच्या प्रतींनिधींनी माणगाव पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्याशी जाऊन संपर्क साधला असता. त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, गेले ८ दिवस नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबई व पुणे येथून लाखो पर्यटक कोकणात व तळकोकणात साजरे करण्यासाठी येत आहेत. त्यामुळे महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी होत आहे. माणगाव वाहतूक शाखा यांचे नियोजन करून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी माणगाव वाहतूक पोलिसांनी प्रचंड मेहनत घेतली त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

पुढे देशमुख साहेबांनी असे बोलताना सांगितले की,नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून इंदापुर,खरवळी,निजामपुर, विळा भागाड, भिरा पाटणूस, मोर्बा, साई या भागात फार्म हाऊसवर रेव्ह पार्टी, जंगल टेंट, लावून पार्ट्या करून अनुचित प्रकार घडू नये म्हणून माणगांव पोलिसांनी तालुक्याच्या विविध ठिकाणी आपले पथक नेमून करडी नजर ठेवून गस्त वाढविण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *