फणसाड अभयारण्यात सलग दोन दिवस बिबट्या वाघाने दिले पर्यटकांना दर्शन

Share Now

337 Views

रोहा (प्रतिनिधी) रोहा व मुरुड तालुक्यात असणारे नेते अभयारण्य हे नंदनवन पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. येथे बिबट्या वाघासह शेकडो प्रकारचे प्राणी पक्षी, वास्तव्य करून आहेत, त्यामुळे या अभय अरण्यात पर्यटकांनी गर्दी असते. काल दिवसा येथे बिबट्याने ग्रामस्थांना, पर्यटकांना बिबट्याने दर्शन दिले.

वनविभाग वन्य जीव ठाणे उपवनसंरक्षक पिंगळे, सहाय्यक वनसंरक्षक एन.एन. कुप्ते यांच्या मार्गदर्शनखाली प्राण्यांचे निरीक्षण संवक्षण करण्यासाठी आर.एफ.ओ राजवर्धन भोसले, गणेश दिघे, वनपाल सुडकोली उदय पाटील, वन रक्षक गीता बांगर हे रात्रीची गस्त घालत असताना सदर बिबट्या वाघ आढळून आला.

सदर बिबट्या हा गेले दोन दिवस या वनविभागात मुक्त सपने मुक्त संचार होता त्यामुळे येथे येणारे पर्यटक यांनाही त्याचे दर्शन झाले, बिबट्या वाघ पाहण्यासाठी हजारो संख्येने येथे हे पर्यटक येत असतात काल दोन दिवस बिबट्या आढळल्याने पर्यटकहि आनंद होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *