किल्ले अवचितगडावर अज्ञाताकडून वणवा लावण्यात आला, स्थानिक ग्रामस्थ संदिप जाधव व अन्य पर्यटकांच्या मदतीने वणवा विझवण्यास यश

Share Now

506 Views

रोहा (सुयोग जाधव) कळसगिरी शिखरासमोर, निसर्ग सौंदर्याने नटलेल्या किल्ले अवचितगडावर अज्ञाताने वणवा लावला होता. मेढा गावातील ग्रामस्थ संदिप जाधव हे दिनांक 15 जानेवारीला किल्ले अवचितगडावर लहान- मोठ्या मुलांना घेऊन पर्यटनासाठी गेले असताना, त्यांना किल्ल्यावर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने वणवा लावलेला निदर्शनास आले. लगेचच त्यांनी आपल्यासोबत असलेली पर्यटनासाठी गेलेली मुले सपना चाचे, साक्षी जाधव, श्रुती जाधव, श्रवण जाधव, तनिष्का जाधव, आर्या गोवर्धने, सार्थक जाधव यांना सोबत घेऊन वणवा विझवण्यास सुरुवात केली. ऊन व वाऱ्याच्या वेगामुळे आग वाढतच जात होती. वणव्याने प्रचंड पेट घेतला होता. त्यामुळे वणवा विझवणे कठीण होते. ही आग वेळीच आटोक्यात आली नाहीतर गडावर येणाऱ्या इतर पर्यटकांना दुखापत झाली असती.

जे वणवा विझवण्यास मिळेल त्या साहित्याने वणवा विझवत होते. वणवा विझवत असताना लहान मुलांच्या हाताला थोडफारं प्रमाणात जखम झाली. पण मनात एकच महाराजांविषयी असलेली भक्ती,आणि आपले गड संरक्षण या उद्देशाने ते काम करीत राहिले. जवळपास दोन ते तीन तासाच्या प्रयत्नांनंतर वणवा विझवण्यास यश आले. वणव्यात लहान मोठ्या झाडांचे नुकसान झाले, काही झाडे शिवशंभू प्रतिष्ठान व इतर सामाजिक संस्थाकडून लावण्यात आली होती. ही झाडे काही प्रमाणात जळून गेली. या सर्वांनी उत्तम गड स्वच्छता करून वणव्यापासून होणाऱ्या अति नुकसानीला रोखलं आहे, त्यामुळे सर्वांचे सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे.

दरवर्षी गडावर मुंबई, पनवेल, अलिबाग येथून खुप पर्यटक येत असतात, काही पर्यटक असे असतात गडावर कोणत्याही प्रकारची अस्वच्छता होणार नाही याची काळजी घेतात परंतू काहीजण सामाजिक भान न ठेवता अस्वच्छता करतात. त्यामध्ये खाद्यपदार्थांचे पुडे, कागद शीतपेयाच्या बॉटलस यांसारखा कचरा करतात. असं न करता प्रत्येकाने गडकिल्यांची व पर्यावरणाची काळजी घेणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *