काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश मगर आणि ज्येष्ठ बाळकृष्ण पाडसे यांचा सन्मान, न्यू कुंडलिका वैभव संस्थेत वार्षिक स्नेहसोहळा संपन्न

Share Now

232 Views

रोहा (प्रतिनिधी) रोहा तालुका ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश संपादन करून तालुक्यातील जनतेचे लक्ष वेधणारे काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश मगर आणि संस्थेसाठी अविरत योगदान देणारे ज्येष्ठ बाळकृष्ण पाडसे यांचा न्यू कुंडलिका वैभव संस्थेच्या वार्षिक स्नेह सोहळ्यात संस्थेच्या पदाधिकारी यांच्याकडून यथोचित सन्मान करण्यात आले.

रोहयातील न्यू कुंडलिका वैभव गृहनिर्माण संकुलात वार्षिक स्नेहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, यानिमित्ताने संकुलातील महिला, पुरुष आणि मुलांचे विविध कार्यक्रम घेण्यात आले. तर मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धाही घेण्यात आल्या, स्नेहसोहळ्या निमित्ताने संकुलात महापूजा आणि महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी संकुलातील लहाणग्यांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांनी नृत्याविष्कार सादर केले, त्यामध्ये संगीत खुर्ची, गाणी गाणे, महिलांच्या स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धाही संपन्न झाली, रांगोळी स्पर्धेत कु. गौरी संजय धोदरे प्रथम, कु. प्रियांका तानाजी कांबळे द्वितीय तर कु. सुकन्या सहदेव जाधव हिने तृतीय क्रमांक प्राप्त केलें. सायंकाळी बक्षीस वितरण कार्यक्रमात संकुलातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी न्यू कुंडलिका वैभव सोसायटीकरीता अविरत आणि अखंडितपणे सेवा देणारे ज्येष्ठ मार्गदर्शक बाळकृष्ण पाडसे काका आणि बलाढ्य पक्ष समोर असतानाही वाशी ग्रामपंचायत निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाची मदत न घेता एकाकी झुंज देत सर्वच्या सर्व 9 जागा जिंकत मास लीडर आणि किंगमेकर ठरलेले काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश मगर यांचा संस्थेचे अध्यक्ष विकास रुमडे, सेक्रेटरी महादेव रावकर आणि ज्येष्ठ आप्पा तथा रविंद्र मोरे यांच्याहस्ते यथोचित सन्मान करण्यात आले.

याप्रसंगी कमिटी मेंबर सहदेव जाधव, रवी तथा केशव गावंडे, तानाजी कांबळे, राजेंद्र कांबळे, मधुसूदन कोंडारेड्डी, भावेश अग्रवाल, विनोद पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. स्नेहसोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष विकास रुमडे व सेक्रेटरी महादेव रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सभासदांनि परिश्रम घेतले, तर महिला अध्यक्षा सौ. सरोज रुमडे, सौ. स्नेहल मगर आणि सौ अंकिता रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मंडळाने कार्यक्रमांचे नीटनेटके नियोजन केले. अभिजित कांबळे, महेश मोरे, किशोर मुक्षे, राहुल मगर, प्रतिक कांबळे, सागर गावंडे, शुभम चांदीवडे, संकेत जाधव, आकाश कांबळे, किरण मुक्षे, समीर जाधव आदींनी या स्नेह सोहळ्यासाठी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *