जिल्हा आरोग्य विभाग, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग अंतर्गत चित्ररथातून आरोग्य विषयक जनजागृती

Share Now

506 Views

महाड (वार्ताहर) जिल्हा आरोग्य विभाग, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग अंतर्गत चित्ररथातून आरोग्य विषयक जनजागृतीला सुरुवात झाली आहे.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आरोग्य विभाग, रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्या माध्यमातून पालकमंत्री-आदिती तटकरे, निधी चौधरी- जिल्हाधिकारी, रायगड- अलिबाग, योगिता पारधी – अध्यक्षा, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग, डॉ.किरण पाटील- मुख्यकार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग, डॉ. सुधाकर मोरे- जिल्हा आरोग्य अधिकारी, तपस्वी गोंधळी- राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी, भारत सरकार, राजेंद्र भिसे- जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, सुचिता साळवी- अध्यक्षा स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था, रोहा यांसह सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा मुख्यालय पोलीस परेड ग्राऊंड येथे उदघाटन करण्यात आले.

सदर आरोग्य रथातून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’, कोव्हीड लस सुरक्षित आहे, बेटी बचाओ, बेटी पाढाओ, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, बाळाचे लसीकरण वेळेवर करा यांसह आरोग्य विषयक जनजागृती करण्यात येत आहे. या आरोग्य रथाचे नेतृत्व तपस्वी गोंधळी करीत असून या चित्ररथाची प्रतिकृती स्वयंसिद्धा संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *