माणगाव : टेम्पो-एसटीची धडक; 1 ठार, 21 जखमी , मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील घटना, जखमींमध्ये महाड तालुक्यातील प्रवाशांचा समावेश

Share Now

447 Views

माणगाव (प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावर माणगावपासून 10 किमी अंतरावरील नगरोली फाटा येथे एसटी आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, दोन्ही वाहनांमधील 21 जण जखमी झाले. ही दुर्घटना गुरुवारी (28 जानेवारी) सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडली.

टेम्पो चालक अनंत मोतीराम वाघमारे (वय 40, रा. भाले आदिवासीवाडी, निजामपूर ता.माणगाव) हा त्याच्या ताब्यातील आयशर टेम्पोमध्ये भाताचा तूस भरून कामगारांना सोबत घेऊन इंदापूरकडे निघाला होता. सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास माणगावजवळील नगरोली फाटा येथे भरधाव वेगात निघालेल्या या टेम्पोने रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन मुंबईकडे निघालेल्या एसटीला समोरुन धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की यामध्ये एसटीची चालक बाजू आणि टेम्पोच्या केबिनचा चुराडा झाला.

टेम्पो चालक अनंत वाघमारे याचा गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला. तर दोन्ही वाहनांमधील रामचंद्र यशवंत रसाळ (54, रा.सोनसडे ता.तळा), अमजद शेख मकबूल शेख (वय 34, रा.भाईंदर मीरा मूळ रा.पश्चिम बंगाल), अनिकेत अरुण गोगरकर (वय 24, रा.मंडणगड), राकेश शंकर कदम (वय 30, रा.वाशी नवी मुंबई), सतीश तुळशीराम मोरे (वय 55, रा.साकीनाका मुंबई), नथुराम सखाराम मोरे (वय 57, रा. उंबर्डी ता.माणगाव), रविंद्र लक्ष्मण वाघमारे (वय 20, रा.भाले ता.माणगाव), महेश हनुमंत जाधव (वय 20, रा.निवी आदिवासीवाडी ता.माणगाव), संदीप मनोहर वाघमारे (वय 19, रा.भाले ता.माणगाव), पोपट काटे (वय 60, रा.महाड), नाना काशीराम सोळंकी (वय 68, रा.महाड), अशोक शंकर चव्हाण (वय 52, रा.पनवेल), प्रशांत शिवराम पिंपळकर (वय 33, रा.दापोली जि.रत्नागिरी), संजय मधुकर जायले (वय 35, रा.नालासोपारा डेपो), रामनाथ जायकू मिरवळ (वय 46, रा.नालासोपारा डेपो, मूळ रा.जि.जालना), विवेक बाळूसव भुवन (वय 37, रा.डहाणू कानाडी कांदिवली प.), अमित नागराज जोशी (वय 42, रा.वर्तक नगर ठाणे प.), योगिता अनंत पाचकले (वय 35, रा.गिरगाव फणसवाडी मुंबई), अंकिता तुषार तटकरे (वय 25, रा.दादली किंजलघर महाड), तुषार रामचंद्र तटकरे (वय 28, रा.दादली किंजलघर महाड), कमल अनंत जाधव (वय 35, रा.कोपरी गाव, वाशी, नवी मुंबई) हे 21 जण जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना औषोधोपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात माणगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी जखमींची विचारपूस करून माहिती घेतली.तसेच माणगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य महामूद धुंदवारे, रणधीर कनोजे यांनीही रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस करून त्यांना मदत केली. या अपघाताची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालयाबाहेर नागरिकांची गर्दी झाली होती. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपस पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियांका बुरुंगले या करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *