रोहा लायन्स क्लबच्या वतीने उपजिल्हा रूग्णालयास वैद्यकीय उपकरणे

Share Now

373 Views

रोहा (महेंद्र मोरे) रोहा लायन्स क्लबच्या वतीने उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांच्या सेवेसाठी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या विविध चाचण्या जलद व योग्य पद्धतीने होण्यासाठी बायोकेमिस्ट्री पॅथाॅलाॅजी एनालायझर देण्यात आले. यासोबतच लायन्स क्लब संचालित रोहा व्हिजन सेंटर येथील सुविधा अद्ययावत करण्यासाठी इनडायरेक्ट ऑफ्थाॅलमोस्कोप ही यंत्रणा बसविण्यात आली. बुधवार २७ जानेवारी २०२० रोजी लायन्स क्लबचे फर्स्ट व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन एल जे टावरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या दोन्ही सुविधांचे लोकार्पण करण्यात आले.

लायन्स क्लब रोहा चे अध्यक्ष किर्ती शेठ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास वासुदेव बाळकृष्ण मेहेंदळे, खाजगत धर्मादाय न्यासचे मुख्य विश्वस्त सुभाष श्रीकृष्ण मेहेंदळे, निलिकॉनचे व्यवस्थापक बी. एच .शेट्टी, लायन्स क्लबचे पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अनिल जाधव, लायन एस एन मूर्ती, लायन अनिल म्हात्रे, एक्स डिस्ट्रिक्ट कॅबिनेट ट्रेझरर लायन नयन कवळे, रिजन चेअरपर्सन प्रदीप सिनकर व लायन नितिन अधिकारी, झोन चेअरपर्सन अनुप तलवार, रोहा उपजिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ अंकिता मते खैरकर आदी मान्यवरांचेसह लायन्स क्लब रोहा चे माजी अध्यक्ष रवींद्र घरत, प्रभातसिंह गिरासे, प्रमोद जैन, इलयास डबीर, महावीर जैन, नितिन पिंपळे, सौ नेहा पिंपळे, व्यंकट माने, हर्षद मेहता उपस्थित होते.

रोहा शहरात अनेक लोकोपयोगी सेवा सुविधा देणारे दानशूर व्यक्तिमत्त्व यांनी लायन्स क्लब च्या माध्यमातून रोहा उपजिल्हा रूग्णालयात ही यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे रोह्यातील गरीब व गरजू रूग्णांना सर्व चाचण्या मोफत करून मिळणार आहेत. निलिकाॅन फूड डाईज अँड केमिकल्स ने लायन्स क्लब रोहाला दिलेल्या यंत्रामुळे लायन्स क्लब रोहा च्या व्हिजन सेंटर मध्ये येणा-या रुग्णांची नेत्र तपासणी अधिक अचूक आणि प्रभावी करता येईल.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस ॲड.हेमंत गांगल यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. उपाध्यक्ष नुरूद्दीन रोहावाला, खजिनदार भाऊसाहेब माने व सहकारी सदस्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सेक्रेटरी पराग फुकणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. लायन्स क्लब सदस्य व रोहा मधील सामाजिक कार्यात अगेसर असणारे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *